बुलडाण्यात दिव्यांग तपासणी शिबिर नियमित सुरू राहणार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा सामान्य रुग्णालयात नियमितपणे महिन्यातील प्रत्येक बुधवारी दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मार्चपासून दिव्यांग तपासणी बोर्डाचे कामकाज रद्द करण्यात आले होते. यापुढे जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणी शिबिर 9 जूनपासून महिन्यातील प्रत्येक बुधवारी कोविड 19 नियमांच्या अधीन राहून नियमितपणे सुरू करण्यात येत आहे. बोर्डामध्ये 50 दिव्यांग व्यक्तींची तपासणी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा सामान्य रुग्णालयात नियमितपणे महिन्यातील प्रत्येक बुधवारी दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मार्चपासून दिव्यांग तपासणी बोर्डाचे कामकाज रद्द करण्यात आले होते. यापुढे जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणी शिबिर 9 जूनपासून महिन्यातील प्रत्येक बुधवारी कोविड 19 नियमांच्या अधीन राहून नियमितपणे सुरू करण्यात येत आहे. बोर्डामध्ये 50 दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.