बुलडाण्यात दोन शीतशवपेटी उपलब्ध; आमदार गायकवाड यांच्‍या हस्‍ते लोकार्पण

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील नागरिकांसाठी शिवसेनेतर्फे आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून दोन शीतशवपेटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. शीतशवपेट्यांचे लोकार्पण आज, १६ ऑक्टोबरला दुपारी आमदार गायकवाड यांच्या हस्ते मातोश्री जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. शव जास्त दिवस टिकत नाही. मृतकाचे नातेवाइक दूर गावातून येईपर्यंत गंध सुटतो. ते शव खराब होते. नातलग …
 
बुलडाण्यात दोन शीतशवपेटी उपलब्ध; आमदार गायकवाड यांच्‍या हस्‍ते लोकार्पण

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील नागरिकांसाठी शिवसेनेतर्फे आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून दोन शीतशवपेटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. शीतशवपेट्यांचे लोकार्पण आज, १६ ऑक्‍टोबरला दुपारी आमदार गायकवाड यांच्या हस्ते मातोश्री जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.

शव जास्त दिवस टिकत नाही. मृतकाचे नातेवाइक दूर गावातून येईपर्यंत गंध सुटतो. ते शव खराब होते. नातलग येईपर्यंत शव खराब होऊ नये याकरिता त्यास पेटीत ठेवले जाते. बुलडाण्यात पेटीसंख्या कमी असल्याने आमदार संजय गायकवाड यांनी पुढाकार घेऊन पेट्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या पेट्यांची आवश्यकता ज्यांना असेल त्यांनी मोताळा तालुक्यात ज्ञानेश्वर वाघ व बुलडाणा तालुक्यात मृत्यूंजय ऊर्फ कुणाल संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी धर्मवीर आखाडा अध्यक्ष मृत्यूंजय संजय गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, आरोग्य सभापती आशिष जाधव, युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, बाळाभाऊ जेऊघाले, दीपक तुपकर, स्वीय सहायक श्रीकृष्णा शिंदे, अनुप श्रीवास्तव, संतोष शिंगणे, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे, प्रवीण वाघलव्हाळे, मदन हिवाळे, नीलेश डांगे तसेच शिवसैनिक तथा युवासैनिक उपस्थित होते.