बुलडाण्यात पाऊस कोसळला; नांदुऱ्यात वीज पडून युवक ठार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हवामान खाते आजकाल भलतेच अचूक अंदाज व्यक्त करू लागलेय! त्यांच्या अंदाजाला अचूक ठरवत पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली. नांदुरा तालुक्यात या अवकाळी पावसाने एका युवकाचा बळी घेतला. बुलडाणा शहरात आज 2 मे रोजी अवकाळी पावसाने जोमदार हजेरी लावली. बारीक गारा व टपोरे थेंब याने दुपारी साडेतीनच्या आसपास …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हवामान खाते आजकाल भलतेच अचूक अंदाज व्यक्त करू लागलेय! त्यांच्या अंदाजाला अचूक ठरवत पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली. नांदुरा तालुक्यात या अवकाळी पावसाने एका युवकाचा बळी घेतला.

बुलडाणा शहरात आज 2 मे रोजी अवकाळी पावसाने जोमदार हजेरी लावली. बारीक गारा व टपोरे थेंब याने दुपारी साडेतीनच्या आसपास सुरुवात केल्यावर पावसाचा जोर वाढला. सुमारे 25 मिनिटे झालेल्या या पावसाने शहरवासीय सुखावले. दरम्यान, नांदुरा तालुक्यात या अवकाळीने एका युवकाचा बळी घेतला. आमचे नांदुरा प्रतिनिधी प्रवीण तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा तालुक्यातील वसाडी बुद्रूक येथे अंगावर विजेचा लोळ पडून अनंता श्रीकृष्ण बोडखे (28) याचा करुण अंत झाला. तो शेतात गुरे व मेंढ्या चारण्यासाठी घेऊन गेला होता. परिसरात वाऱ्यासह हलका पाऊस विजेचा गडगडाट होत होता. तो घरातील मोठा असून, होतकरू- मेहनती असल्याने कुटुंब मोठा आधारच हिरावला गेला आहे. त्याच्यामागे पत्‍नी, एक मुलगा, आई व वडील भाऊ असा परिवार आहे.