बुलडाण्यात महाविक्रम! कोविड लॅबने एक लाख नमुने तपासून केली मोठी कामगिरी!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाने गत् मार्च 2020 मध्ये बुलडाणा शहरासह जिल्ह्यात एंट्री करून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. दीर्घ प्रतीक्षेनंतर बुलडाणा शहरात 24 सप्टेंबर 2020 रोजी कोरोना स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू झाली. उशिरा सुरू होऊनही युद्धपातळीवर पण अचूक व धडाकेबाज कामगिरी करत या लॅबने गेल्या पाच महिन्यांमध्ये तब्बल एक लाख नमुने …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाने गत्‌ मार्च 2020 मध्ये बुलडाणा शहरासह जिल्ह्यात एंट्री करून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. दीर्घ प्रतीक्षेनंतर बुलडाणा शहरात 24 सप्टेंबर 2020 रोजी कोरोना स्‍वॅब टेस्टिंग लॅब  सुरू झाली. उशिरा सुरू होऊनही युद्धपातळीवर पण अचूक व धडाकेबाज कामगिरी करत या लॅबने गेल्या पाच महिन्यांमध्ये तब्बल एक लाख नमुने तपासणीचा विक्रम केला आहे. यामुळे लॅबशी संबंधित चमू कौतुक व अभिनंदनास पात्र ठरली आहे.

जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने पूर्वी तपासणीसाठी अकोला, अमरावती, यवतमाळ तर कधी नागपूर येथे पाठवावे लागत होते. तेथून त्यांचे तपासणी अहवाल यायला पाच दिवसांचा वेळ लागत होता. आता जिल्ह्यातील कोरोना संशयितांची स्वॅब नमुने तपासणी  जिल्ह्यातच  होत असल्याने अहवाल लवकर प्राप्त होत आहेत. रोग्याला योग्य वेळी उपचार घ्यायला खूप मदत होत आहे. नोडल ऑफिसर डॉ. प्रशांत पाटील, प्रभारी अधिकारी डॉ. पल्लवी वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजयसिंह राजपूत, डॉ. समर खान ,डॉ. हिदायत खान, डॉ. शीतल सोळंके, अविनाश हिवाळे, सोपान शिंदे, प्रविण वाकोडे, श्रद्धा लांडगे, चेतन एकडे ,वैभव तावरे, ज्ञानेश्वर खांडेभराड, शीतल इंगळे, अशोक मुंडे, वैभव जाधव, नीलेश इंगोले, दीपक सुसर, गजानन बोरखडे, भारत सुरडकर, शेख जहीर, शेख सलमान, शेख वसीम, प्रवीण चव्हाण, प्रतीक सालोख, प्रथमेश शिरसाट, मनीषा गायकवाड यांचा समावेश असलेल्या या टीम लॅबने ही कामगिरी बजावली आहे. 

हे तर टीमवर्क…

डॉक्टर अजय सिंग राजपूत हे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यान्वित आहेत. त्यांना प्रत्येक अहवालाची पुष्टी करावी लागते. त्यांच्या आतापर्यंत एक लाख अहवालांमध्ये एकही चूक नाही हे विशेष, ही मोठी उपलब्धी असल्याचे डॉ. राजपूत मानतात. आपणास अमित किन्हीकर, अमोल साळोख, गजानन भोरखळे, महेश महेत्रे, सचिन राठोड यांच्‍यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभल्याचे त्यांनी बुलडाणा लाईव्हसोबत बोलताना सांगितले.