बुलडाण्यात महिलेची कार फोडली!; तरुणाविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली रोडवरील सिपा गॅरेजसमोर उभी कार एकाने फोडली. मागील काच आणि रेडिएटरचे नुकसान केले. ही घटना काल,३० जुलैच्या रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. सौ. छाया श्यामसिंह राजपूत (३५) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. कुणाल रामेश्वर तायडे (२३, रा. धाड नाक्याजवळ, राजपूत ले आउट, बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. सौ. छाया या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली रोडवरील सिपा गॅरेजसमोर उभी कार एकाने फोडली. मागील काच आणि रेडिएटरचे नुकसान केले. ही घटना काल,३० जुलैच्‍या रात्री साडेनऊच्‍या सुमारास घडली.

सौ. छाया श्यामसिंह राजपूत (३५) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. कुणाल रामेश्वर तायडे (२३, रा. धाड नाक्याजवळ, राजपूत ले आउट, बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. सौ. छाया या भाऊ गणेशच्‍या शिक्षणासाठी अटकळ गावावरून बुलडाण्यात राहायला आल्या असून, समतानगरात किरायाने राहतात. काल रात्री साडेनऊच्‍या सुमारास कुणाल तायडे त्‍यांच्‍याकडे आला व गणेशकडे दोन हजार रुपये उधारी असल्याचे सांगून पैसे आताच पाहिजेत असे म्‍हणाला. छाया राजपूत यांनी त्‍याला दोन दिवसांनी पैसे देईल असे सांगितले. मात्र तो शिविगाळ करत रागाने निघून गेला. जाता जाता त्‍याने सिपा गॅरेजसमोर लावलेली कार (MH-28-AZ-1989)फोडली. यात २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तपास अधिकारी पोहेकाँ दत्तात्रय नागरे करत आहेत.