बुलडाण्यात मिहिरचे जंगी स्वागत!; भारताला जिंकून दिलेय सुवर्णपदक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलंड येथे पार पडलेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताला सुर्वपदक मिळाले होते. सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा युवा खेळाडू मिहीर नितीन अपार या युवा तिरंदाजाचे आज, १८ ऑगस्टला बुलडाण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. १४ ऑगस्ट रोजी भारतीय संघाने अमेरिकेला धूळ चारत सुवर्णपदक पटकावले होते. या सामन्यात बुलडाण्याच्या अवघ्या …
 
बुलडाण्यात मिहिरचे जंगी स्वागत!; भारताला जिंकून दिलेय सुवर्णपदक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलंड येथे पार पडलेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताला सुर्वपदक मिळाले होते. सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा युवा खेळाडू मिहीर नितीन अपार या युवा तिरंदाजाचे आज, १८ ऑगस्‍टला बुलडाण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

१४ ऑगस्ट रोजी भारतीय संघाने अमेरिकेला धूळ चारत सुवर्णपदक पटकावले होते. या सामन्यात बुलडाण्याच्या अवघ्या १६ वर्षांच्या मिहिरने लक्षवेधी कामगिरी केली होती. आज मिहीर व त्याचे प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांचे बुलडाण्यात आगमन झाले. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्यासह विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. जयस्तंभ चौकात फटाके फोडून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मिहिरने देशासोबतच बुलडाण्याचीही मान उंचावली आहे ,त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत आमदार संजय गायकवाड यांनी मिहिरचे कौतुक केले.