बुलडाण्यात येणारा ३ कोटींचा गांजा पकडला!; जिल्ह्यातून बदलून गेलेल्या “या’ ठाणेदारांनी केली धडाकेबाज कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यात येत असलेला साडेअकरा क्विंटल गांजा रिसोड (जि. वाशिम) पोलिसांनी पकडला. या गांजाची किंमत तब्बल ३ कोटी ४५ लाख रुपये इतकी आहे. दोन महिन्यांपूर्वी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यातून रिसोड ठाणेदार म्हणून रूजू झालेले सारंग नवलकार यांनी ही कारवाई आज, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास हिंगोली- रिसोड रोडवर केली. पकडलेले …
 
बुलडाण्यात येणारा ३ कोटींचा गांजा पकडला!; जिल्ह्यातून बदलून गेलेल्या “या’ ठाणेदारांनी केली धडाकेबाज कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यात येत असलेला साडेअकरा क्विंटल गांजा रिसोड (जि. वाशिम) पोलिसांनी पकडला. या गांजाची किंमत तब्बल ३ कोटी ४५ लाख रुपये इतकी आहे. दोन महिन्यांपूर्वी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यातून रिसोड ठाणेदार म्हणून रूजू झालेले सारंग नवलकार यांनी ही कारवाई आज, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास हिंगोली- रिसोड रोडवर केली. पकडलेले चारही आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ते गांजा घेऊन येत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

हिंगोली- रिसोड रस्त्याने एका आयशर ट्रकमध्ये गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती रिसोडचे ठाणेदार सारंग नवलकार यांना मिळाली. त्यांनी पथकासह सापळा रचून आयशरची (क्र. एमएच २८ बीबी ०८६७) तपासणी केली. त्यात गांजा मिळून आला. पंचासमक्ष गांजाचे वजन केले असता साडेअकरा क्विंटल गांजा असल्याचे समोर आले. पोलिसांनी गांजासह आयशर ट्रक (किंमत २० लाख) असा एकूण ३ कोटी ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक केली. गोटीराम गुरदयाल साबळे (५२, रा. कुन्हा, ता. मोताळा), सिध्दार्थ भिकाजी गवादे (रा. निमगाव ता. नांदुरा), प्रविण सुपडा चव्हाण, संदीप सुपडा चव्हाण (रा. हनवतखेड ता. मोताळा) अशी आरोपींची नावे आहेत.