बुलडाण्यात लवकरच मुलींसाठी निरीक्षणगृह; मंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती

बुलडाणा (कृष्णा सपकाळ : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अन्याय ,अत्याचार झालेल्या, तसेच अल्पवयीन व कुमारी माता मुलींसाठी जिल्ह्यात लवकरच निरीक्षणगृह सुरू करण्यात येईल असे मंत्री यशोमती ठाकूर यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. बुलडाण्यातील बालगृहाला भेट देण्यासाठी आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या.अन्याय, अत्याचार झालेल्या अल्पवयीन, निराधार, कुमारी माता आदी मुलींना बालगृहात ठेवण्यात येते. मात्र याच मुलींना …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अन्याय ,अत्याचार झालेल्या, तसेच अल्पवयीन व कुमारी माता मुलींसाठी जिल्ह्यात लवकरच निरीक्षणगृह सुरू करण्यात येईल असे मंत्री यशोमती ठाकूर यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. बुलडाण्यातील बालगृहाला भेट देण्यासाठी आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
अन्याय, अत्याचार झालेल्या अल्पवयीन, निराधार, कुमारी माता आदी मुलींना बालगृहात ठेवण्यात येते. मात्र याच मुलींना पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवण्याची आवश्यकता पडल्यास जिल्ह्यात तशी व्यवस्था नाही. या मुलींना अकोला, अमरावती, औरंगाबाद या ठिकाणच्या निरीक्षण गृहात पाठवावे लागते. त्यासाठी बाल संरक्षण समितीला अनेक अडथळयांचा सामना करावा लागतो. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात मुलींचे निरीक्षण गृह व्हावे, यासाठी बाल संरक्षण समिती कडून महिला व बालकल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. काही तांत्रिक अडचणी मुळे हा प्रस्ताव प्रलंबित होता. या सर्व तांत्रिक अडचणी पूर्ण करून लवकरच जिल्ह्यात मुलींसाठी निरीक्षण गृह सुरू करण्यात येणार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.