बुलडाण्यात ७ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिसाळलेल्या कुत्र्याने तासाभरात ७ जणांना चावा घेतला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी कुत्र्याला मारून टाकले. ही घटना आज, १४ जुलै रोजी सकाळी साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान बुलडाणा शहरातील तेलगूनगर, इकबालनगर, जोहरनगर भागात घडली. शोन ठाकरे (२, रा. तेलगूनगर) हा अंगणात खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. ते पाहून नागरिकांनी आरडाओरड केल्याने …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पिसाळलेल्या कुत्र्याने तासाभरात ७ जणांना चावा घेतला. त्‍यानंतर संतप्‍त नागरिकांनी कुत्र्याला मारून टाकले. ही घटना आज, १४ जुलै रोजी सकाळी साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्‍यान बुलडाणा शहरातील तेलगूनगर, इकबालनगर, जोहरनगर भागात घडली.

शोन ठाकरे (२, रा. तेलगूनगर) हा अंगणात खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. ते पाहून नागरिकांनी आरडाओरड केल्याने कुत्रा तेथून पळाला. त्यानंतर हा कुत्रा दिसेल त्‍याला चावा घेत सुटला. ६ जणांना त्‍याने चावा घेतला. यात अयुब खान जब्बार खान (५३, रा. जोहरनगर, बुलडाणा), अमिदाबी शेख सलाम (५०, रा. इकबालनगर, बुलडाणा), शेख नईम शेख जब्बार (२८, जोहरनगर बुलडाणा), शेख आझम शेख कादर (३४, रा. इकबालनगर), सोहम वैभव ठाकरे (रा. बुलडाणा) अशी जखमींची नावे आहेत. सर्वांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.