बेपत्ता अश्विनकुमार सानप अवतरले बुलडाणा लाइव्ह कार्यालयात!; म्‍हणाले, माझ्या जिवाला पत्‍नीपासून धोका, त्‍यामुळे राहतोय बाहेरगावी!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल, २१ सप्टेंबरला किनगाव राजा पोलिसांत नोंद झालेल्या “मिसिंग’वरून बुलडाणा लाइव्हने अश्विनकुमार पंढरी सानप हे बेपत्ता झाल्याची बातमी दिली होती. ही बातमी वाचून बेपत्ता झालेले श्री. सानप आज, २२ सप्टेंबरला बुलडाणा लाइव्ह कार्यालयात अवतरले! मी बेपत्ता झालेलो नाही. माझ्या जिवाला पत्नी व तिच्या भावापासून धोका असून, त्यामुळेच मी बाहेरगावी राहत …
 
बेपत्ता अश्विनकुमार सानप अवतरले बुलडाणा लाइव्ह कार्यालयात!; म्‍हणाले, माझ्या जिवाला पत्‍नीपासून धोका, त्‍यामुळे राहतोय बाहेरगावी!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल, २१ सप्‍टेंबरला किनगाव राजा पोलिसांत नोंद झालेल्या “मिसिंग’वरून बुलडाणा लाइव्हने अश्विनकुमार पंढरी सानप हे बेपत्ता झाल्याची बातमी दिली होती. ही बातमी वाचून बेपत्ता झालेले श्री. सानप आज, २२ सप्‍टेंबरला बुलडाणा लाइव्ह कार्यालयात अवतरले! मी बेपत्ता झालेलो नाही. माझ्या जिवाला पत्‍नी व तिच्‍या भावापासून धोका असून, त्‍यामुळेच मी बाहेरगावी राहत असल्याचे त्‍यांनी सांगितले.

श्री. सानप म्‍हणाले, की पत्‍नी भारतीने मी बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार २ सप्‍टेंबरला किनगाव राजा पोलीस ठाण्यात केली. तिथून पोलिसांचे फोन आल्याने मी कुठेही हरवलो नसून, हरवल्याची तक्रार खोटी असल्याचे पोलिसांना सांगितले. जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्‍या हेतूने पत्‍नी भारती व तिचा भाऊ पंडित जगन्‍नाथ ताटे (रा. वंजारवाडा, हिंगोली) यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्‍यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्‍यामुळे माझ्या जिविताला धोका आहे. त्‍यामुळे मी बाहेरगावी राहत आहे. माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी पत्‍नी भारती व तिच्या भावावर राहील. त्‍यांच्‍या भितीपोटी किनगाव राजा येथे येऊ शकत नाही, असे त्‍यांनी सांगितले.