बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला विहिरीत; जळगाव जामोद तालुक्यातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १५ जुलैला मडाखेड (ता. जळगाव जामोद) येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. वनिता पुषोत्तम सित्रे (रा. घाणेगाव ता. खामगाव) असे या महिलेचे नाव आहे. ती मडाखेड येथे माहेरी आलेली होती. १५ जुलैला माहेराहून कुणाला काहीही न सांगता ती निघून गेली होती. सर्वत्र शोध …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १५ जुलैला मडाखेड (ता. जळगाव जामोद) येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. वनिता पुषोत्तम सित्रे (रा. घाणेगाव ता. खामगाव) असे या महिलेचे नाव आहे.

ती मडाखेड येथे माहेरी आलेली होती. १५ जुलैला माहेराहून कुणाला काहीही न सांगता ती निघून गेली होती. सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. काल, २० जुलैला सायंकाळी मडाखेड बुद्रूकचे सरपंचांच्‍या वाड्यातील विहिरीत एका मृतदेह तरंगताना दिसून आला. याबाबतची माहिती जळगाव जामोद पोलिसांना देण्यात आली. महिलेच्या वर्णनावरून मृतदेह वनिताचाच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.