बेपत्ता होत असलेल्या महिला, मुलींच्‍या तपासाला गती द्या; “एसपीं’कडे भाजपाची मागणी, “बुलडाणा लाइव्ह’ची बातमी केली सादर!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून बेपत्ता होत असलेल्या महिला, मुलींच्या तपासाला गती देण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चातर्फे आज, १८ ऑक्टोबरला कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात बुलडाणा लाइव्हने १२ ऑक्टोबरला प्रसिद्ध केलेल्या बातमीचा संदर्भ देण्यात आला आहे. प्रदेश सचिव तथा जिल्हा प्रभारी सौ. शालिनीताई बुंधे-चौथनकर यांनी निवेदनात म्हटले आहे, की …
 
बेपत्ता होत असलेल्या महिला, मुलींच्‍या तपासाला गती द्या; “एसपीं’कडे भाजपाची मागणी, “बुलडाणा लाइव्ह’ची बातमी केली सादर!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून बेपत्ता होत असलेल्या महिला, मुलींच्‍या तपासाला गती देण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चातर्फे आज, १८ ऑक्‍टोबरला कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात बुलडाणा लाइव्‍हने १२ ऑक्‍टोबरला प्रसिद्ध केलेल्या बातमीचा संदर्भ देण्यात आला आहे.

प्रदेश सचिव तथा जिल्हा प्रभारी सौ. शालिनीताई बुंधे-चौथनकर यांनी निवेदनात म्‍हटले आहे, की गेल्या ६ महिन्यांत बुलडाणा जिल्ह्यातून सातत्‍याने महिला, तरुणी, मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. रोज कुठून ना कुठून एखादी महिला, मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होते. १२ ऑक्‍टोबरला “बुलडाणा लाइव्ह’वर “धक्कादायक… बुलडाणा जिल्ह्यातून सरासरी रोज एक तरुणी, महिला बेपत्ता!’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीत दिलेली आकडेवारी चिंताजनक आहे.

१ ते ८ ऑक्‍टोबरदरम्‍यान जिल्ह्यातून १० मुली, महिला बेपत्ता झाल्याचे बातमीत म्‍हटले आहे. बेपत्ता होण्याच्‍या वाढत्या घटनांमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. या घटनांचा तपास गांभीर्याने करण्याची आवश्यकता असून, गेल्या सहा महिन्यांत किती महिला, मुलींना पोलिसांनी तपास करून परत आणले, हेही समोर येणे आवश्यक आहे. अशा घटना वाढण्यामागे एखादे रॅकेट तर सक्रीय नाही ना हेही तपासण्याची गरज आहे. या घटनांचा तपास तातडीने करून बेपत्ता झालेल्यांना सुखरुप घरी परत आणण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.