बेरोजगारीचा बळी! हतबल 24 वर्षीय युवकाने घेतला गळफास!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले. अनेक जण यातून सावरलेले नाहीत. त्यातच कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे पुन्हा पुन्हा लॉकडाऊनचे संकट डोक्यावर असल्याने अनेकांत नैराश्य वाढत चालले आहे. बेरोजगारीला कंटाळून हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथील 24 वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल, 12 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना आणि त्‍यानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले. अनेक जण यातून सावरलेले नाहीत. त्‍यातच कोरोना रुग्‍णसंख्या वाढीमुळे पुन्‍हा पुन्‍हा लॉकडाऊनचे संकट डोक्‍यावर असल्याने अनेकांत नैराश्य वाढत चालले आहे. बेरोजगारीला कंटाळून हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथील 24 वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्‍याची धक्‍कादायक घटना काल, 12 मार्च रोजी सकाळी 8 च्या सुमारास समोर आली. सागर अच्युतराव इंगळे (24, रा. भीमनगर, हिवरा आश्रम) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

सागर चांगला शिकलेला होता. मात्र सध्या बेरोजगार होता. त्‍यातूनच तो नैराश्यात होता, असे त्‍याच्‍या मित्रपरिवाराने सांगितले. 11 मार्चच्या रात्रीच तो घरून निघून गेला होता. रात्रीच्या दरम्यान मनोहर यशवंत इंगळे यांच्या शेतातील बांधावरील निंबाच्‍या झाडाला त्‍याने गळफास घेतला. काल सकाळी राहुल भिकेश इंगळे शेतात जात असताना त्यांना सागरने गळफास घेतल्याचे दिसले. सागरच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी बेरोजगारीतून त्‍याने आत्‍महत्‍या केली असावी, अशी चर्चा त्‍याच्‍या मित्रपरिवारात आहे.