बेवारसला “वाली’ मिळाले…१७७ पैकी १५ मालक भेटले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला बेवारस स्थितीत मिळून आलेले १७७ दुचाकी वाहने जप्त करून बुलडाण्यातील पोलीस मुख्यालयाच्या आवारात लावण्यात आली आहेत. या बेवारस वाहनांची कागदपत्रे आणून मालकी हक्क दाखविण्याचे आवाहन करण्यात आले होते. आजवर १५ वाहनमालकांनी मूळ कागदपत्रे आणून मालकी हक्क दाखविला आहे. त्यामुळे याबाबतची सर्व कार्यवाही पूर्ण करून २५ ऑगस्ट …
 
बेवारसला “वाली’ मिळाले…१७७ पैकी १५ मालक भेटले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला बेवारस स्थितीत मिळून आलेले १७७ दुचाकी वाहने जप्त करून बुलडाण्यातील पोलीस मुख्यालयाच्‍या आवारात लावण्यात आली आहेत. या बेवारस वाहनांची कागदपत्रे आणून मालकी हक्क दाखविण्याचे आवाहन करण्यात आले होते. आजवर १५ वाहनमालकांनी मूळ कागदपत्रे आणून मालकी हक्क दाखविला आहे. त्यामुळे याबाबतची सर्व कार्यवाही पूर्ण करून २५ ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोड यांच्याहस्ते ही बेवारस वाहने त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया व अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोड यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीमती निर्मला परदेशी, सहायक पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील, अभय पवार यांनी बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेतला. ज्या नागरिकांचे वाहन चोरी झालेले, हरविलेले बाबत तक्रारी असल्यास त्यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस दलाच्‍या www.buldhanapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध आलेल्या वाहनांच्‍या यादीची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांनी केले आहे.