बैठकीतूनच चोरीला गेला अंगणवाडी सेविकेचा मोबाइल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंत्री खेडेकर (ता.चिखली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून अंगणवाडी सेविकेचा मोबाईल चोरीला गेला. ही घटना काल, 23 फेब्रुवारीला घडली. अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी महिलांची बैठक बोलाविण्यात आली होती. सभागृहातून एका अंगणवाडी सेविकेचा मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार अंगणवाडी सेविकेने अंढेरा पोलीस स्टेशनला दिली …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अंत्री खेडेकर (ता.चिखली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून अंगणवाडी सेविकेचा मोबाईल चोरीला गेला. ही घटना काल, 23 फेब्रुवारीला घडली.

अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी महिलांची बैठक बोलाविण्यात आली होती. सभागृहातून एका अंगणवाडी सेविकेचा मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार अंगणवाडी सेविकेने अंढेरा पोलीस स्टेशनला दिली आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाने अंगणवाडी शाळेतील कारभार पारदर्शक चालावा तसेच अंगणवाडीचे कामकाज ऑनलाइन करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकांना एक महागडा मोबाइल दिला आहे. त्यामुळे या कर्मचारी मोबाइलचा वापर करतात. काल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठक बोलाविण्यात आली होती. सभेला मेरा खुर्द आणि मेरा बुद्रूक सर्कलमधील अंगणवाडी सेविका व आशा मदतनीस कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यामध्ये मेरा खुर्द येथील अंगणवाडी सेविका सौ. सुलोचना हरणे यांचा मोबाइल चोरीला गेला आहे. बैठक सुरू असतांना कोणीतरी नजर ठेवून ही चोरी केली. लगेच मोबाइल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवू लागला. सभेला आलेल्या महिलांना विचारपूस केली असता मोबाइल मिळून आला नाही, अशी तक्रार अंगणवाडी सेविका सुलोचना हरणे यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिली आहे.