बोंद्रे-सपकाळांना राजकीय धक्का!; जात प्रमाणपत्रच बनावट ठरल्याने धाडच्‍या सरपंच अपात्र!; गुन्‍हा दाखल करण्याचे आदेश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनुसूचित जातीसाठी राखीव असलेले धाडचे सरपंचपद मिळविण्यासाठी खातुनबी सय्यद गफार यांनी बनावट जात प्रमाणपत्राचा आधार घेतल्याचे आता समोर आले आहे. जालना जिल्हा जात पडताळणी समितीने खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र बनविल्याचा ठपका ठेवत प्रमाणपत्र रद्द केले आहे. प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस जिल्हाध्यक्ष …
 
बोंद्रे-सपकाळांना राजकीय धक्का!; जात प्रमाणपत्रच बनावट ठरल्याने धाडच्‍या सरपंच अपात्र!; गुन्‍हा दाखल करण्याचे आदेश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनुसूचित जातीसाठी राखीव असलेले धाडचे सरपंचपद मिळविण्यासाठी खातुनबी सय्यद गफार यांनी बनावट जात प्रमाणपत्राचा आधार घेतल्याचे आता समोर आले आहे. जालना जिल्हा जात पडताळणी समितीने खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र बनविल्याचा ठपका ठेवत प्रमाणपत्र रद्द केले आहे. प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे खातुनबी सय्यद गफार यांची पाठिशी होते. त्यामुळे जातपडताळणी समितीने दिलेला हा निकाल काँग्रेससाठी सुद्धा धक्का मानला जात आहे.

धाड येथील उत्तम नारायण थोरात यांनी याप्रकरणाची तक्रार केली होती. सरपंच खातुनबी सय्यद गफार यांनी उपविभागीय अधिकारी जालना यांच्याकडून महार या अनुसूचित जाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र प्राप्त केले होते. मुस्लिम धर्मीय असताना भारती बाबुराव लहाने या अस्तित्वातच नसलेल्या व्यक्तीच्या नावाने अर्ज केला. अनुसूचित जातीचे बनावट प्रमाणपत्र मिळवले. याच बनावट प्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेले सरपंच पद मिळवल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे हे प्रमाणपत्र रद्द करावे, अशी तक्रार जालना जिल्हा जात पडताळणी समितीकडे केली होती.

अर्जदारास त्या अनुसूचित जातीच्या सदस्य नाहीत हे माहीत होते. असे असतानाही राजकीय आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी त्या पदासाठी पात्र असलेल्या व्यक्तीला पदापासून वंचित ठेवण्यात आले. ही कृती म्हणजे शासनाच्या धोरणाची व राज्य घटनेने सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केलेल्या तरतुदींची पायमल्ली ठरते असे मत समितीने व्यक्त केले आहे. धाडच्या सरपंच खातूनबी सय्यद गफार या भारती बाबुराव लहाने या नावाच्या व्यक्ती नाहीत. त्यामुळे त्यांची जात महार असल्याचा त्यांनी केलेला दावा सिद्ध होत नाही. त्यामुळे जालना जिल्हा जात पडताळणी समितीने हा दावा अवैध ठरवला आहे. खातुनबी सय्यद गफार यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.