बोगस कागदपत्रांनी 14 प्लॉट्सची खरेदी! प्रदीप राठीच्‍या अखेर आवळल्‍या मुसक्‍या

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बोगस कागदपत्रे आणि बनावट शिक्यांचा वापर करून 14 प्लॉट्सची खरेदी करून फसवणूक करणाऱ्या प्रदीप राठीला काल, 12 मार्चला आर्थिक गुन्हे शाखेने अकोल्यातून अटक केली. दीड महिन्यापूर्वी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता. अटक टाळण्यासाठी राठीने उच्च न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला होता. …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बोगस कागदपत्रे आणि बनावट शिक्यांचा वापर करून 14 प्लॉट्सची खरेदी करून फसवणूक करणाऱ्या प्रदीप राठीला काल, 12 मार्चला आर्थिक गुन्हे शाखेने अकोल्यातून अटक केली. दीड महिन्यापूर्वी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता.

अटक टाळण्यासाठी राठीने उच्च न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला होता. पोलिसांना तो काल अकोला येथे गेल्याची माहिती मिळाली. त्यावरून अकोल्याच्‍या सिटी कोतवाली पोलिसांच्‍या मदतीने आर्थिक गुन्हे शाखेचे पीएसआय श्री. अंभोरे व त्यांच्या पथकाने राठीला ताब्यात घेतले. त्यानंतर खामगाव येथे वैद्यकीय तपासणी करून कोविड चाचणी करण्यासाठी बुलडाणा येथे आणण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा खामगाव येथे नेण्यात आले. आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. शहरातील अंजू सोनी या विधवा महिलेने राठी यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर 25 जानेवारी 2021 रोजी राठीविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.