बोनेटवरची वरात नववधूला पडली महाग

पुणे : हटके लग्न करण्याचा आणि त्यातून घरातून विवाहस्थळी गाडीच्या बोनेटवर बसून जाण्याचे धाडस नववधूच्या चांगलेच अंगलट आले आहे. तिच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल करू नका, अशी साद नववधूच्या आई व मामाने घातली आहे. स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर बसून नववधू लग्नाला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या आगळ्या वेगळ्या वरातीची चांगलीच चर्चा …
 

पुणे : हटके लग्न करण्याचा आणि त्यातून घरातून विवाहस्थळी गाडीच्या बोनेटवर बसून जाण्याचे धाडस नववधूच्या चांगलेच अंगलट आले आहे. तिच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल करू नका, अशी साद नववधूच्या आई व मामाने घातली आहे.

स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर बसून नववधू लग्नाला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या आगळ्या वेगळ्या वरातीची चांगलीच चर्चा झाली. हा आनंद क्षणतभंगूर ठरला. पोलिसानी गुन्हा दाखल केल्यानंतर, “आनंदाच्या भरात हा व्हिडीओ शूट केला होता, आता व्हायरल करू नका” अशी विनंती मुलीची आई आणि मामा करत आहेत. वधूसह कारचालक, व्हिडिओग्राफर आणि गाडीतील इतर वऱ्हाड्यांवर ही पोलिसांनीकारवाईचा बडगा उगारल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. वधूच्या वडिलांचे १६ वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हा ती सहा वर्षांची होती. मी तिला मोठ्या कष्टाने तिला मोठे केले. मुलीच्या लग्नाच्या आनंदात केलेला हा व्हिडिओ डोकेदुखी ठरेल, असे आम्हा कुटुंबीयांना वाटले नाही, असे सांगून कोणालाही त्रास द्यायचा आमचा उद्देश नव्हता. उत्साहाच्या भरात तो व्हिडिओ शूट केला. तो व्हायरल करु नका,” अशी विनवणी आईने केली आहे.