ब्रेकिंग दिलासा! अनलॉक संदर्भात शासनाची मार्गदर्शक तत्वे जाहीर; सोमवारपासून अंमलबजावणी!! बुलडाणा जिल्हा ‘तृतीय श्रेणीत’ ; उद्या निघणार जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कथित सुपर सीएममुळे वादाचा अन् वादंगाचा विषय ठरलेले अनलॉक संदर्भातील मार्गदर्शक तत्वे राज्य शासनाने अधिकृतपणे जाहीर केली आहेत. यासाठी निकष व 5 स्तर निर्धारित करण्यात आले असून, बुलडाणा जिल्हा तिसऱ्या लेव्हलमध्ये समाविष्ट आहे. या अनलॉकची 7 जूनपासून अंमलबजावणी होणार असून, यासंदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश उद्या, 6 जूनला निघण्याची …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कथित सुपर सीएममुळे वादाचा अन्‌ वादंगाचा विषय ठरलेले अनलॉक संदर्भातील मार्गदर्शक तत्वे राज्य शासनाने अधिकृतपणे जाहीर केली आहेत. यासाठी निकष व 5 स्तर निर्धारित करण्यात आले असून, बुलडाणा जिल्हा तिसऱ्या लेव्हलमध्ये समाविष्ट आहे. या अनलॉकची 7 जूनपासून अंमलबजावणी होणार असून, यासंदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश उद्या, 6 जूनला निघण्याची दाट शक्यता आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने तपशीलवार माहिती व निर्देश असलेला 18 पानी आदेश निर्गमित करण्यात आला आहे. जिल्हानिहाय पॉझिटिव्ही रेट (कोरोनाबाधित होण्याची टक्केवारी) आणि सध्या ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या या दोन निकषांवर 5 स्तर ठरविण्यात आले आहेत. हे निकष लक्षात घेतले तर बुलडाणा जिल्हा ‘तिसऱ्या श्रेणीत’ मोडतो. यामुळे जिल्हा तिसऱ्या स्तरात समाविष्ट झाला आहे. या श्रेणीत मोडणाऱ्या जिल्ह्यातील व्यवहार संध्याकाळी 5 पर्यंत बंद होतील या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे…

उद्या 6 जून रोजी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यासंदर्भात आदेश काढतील अशी दाट शक्यता असून वरिष्ठ सूत्रांनी याला दुजोरा दिला. मार्गदर्शक तत्वे लक्षात घेतली तर या आदेशात खालील बाबींचा समावेश असू शकतो. मात्र जिल्हाधिकारी यांना अंतिम अधिकार असल्याने यात काही बदल होऊ शकतो.

  • अत्यावश्यक सेवा अंतर्गतची दुकाने सर्व दिवस संध्याकाळी 4 वाजेपर्यंत.
  • अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने संध्याकाळी 4 पर्यंत सुरू.
  • मॉल, मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीन, नाट्यगृह बंदच.
  • रेस्टॉरंट भोजन 50 टक्के क्षमतेसह संध्याकाळी 4 पर्यंत व त्यानंतर होम डिलिव्हरी वा पार्सल सेवा.
  • सार्वजनिक स्थळे, खुले मैदान, वॉक, सायकलिंग सकाळी 5 ते 9 पर्यंत, क्रीडा सकाळी 5 ते 9 व आऊट डोअरसाठी संध्याकाळी 6 ते 9
  • जिम, स्पा, सलून, ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेसह संध्याकाळी 4 पर्यंत
  • विवाह समारंभ 50 जणांना मुभा, अंत्यसंस्कार 20 जण
  • संध्याकाळी 5 पर्यंत जमावबंदी तर 5 नंतर संचारबंदी
  • बांधकाम, कृषी कामे 4 वाजेपर्यंत.
  • बस वाहतूक 100 टक्के क्षमतेसह, मात्र उभे राहून प्रवासास मनाई, आंतर जिल्हा प्रवास करणाऱ्या वाहनातील सर्व प्रवाशांना इ पास बंधनकारक.