ब्रेकिंग दिलासा! 15 व्या वित्त आयोगातून कोरोना विलगीकरण कक्ष उभारण्यास मुभा; ग्रामपंचायतींना वापरता येईल 25 टक्के रक्कम

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या ग्रामविकास मंत्रालयाने आता आणखी पुढचे पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातच रुग्णांसाठी कोरोना विलगीकरण कक्ष उभारण्याची परवानगी दिली आहे. यामुळे धोकादायक कोरोनाला गावातच रोखणे शक्य होणार आहे. ग्रामपचायतींना ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना आयसोलेशन सेंटर उभारण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या ग्रामविकास मंत्रालयाने आता आणखी पुढचे पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातच रुग्णांसाठी कोरोना विलगीकरण कक्ष उभारण्याची परवानगी दिली आहे. यामुळे धोकादायक कोरोनाला गावातच रोखणे शक्य होणार आहे.

ग्रामपचायतींना ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना आयसोलेशन सेंटर उभारण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय 25 मे रोजी घेण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीला 15 व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीच्या 25 टक्के मर्यादेत खर्च करता येईल. अवनधित (अनटाईड) निधीतून  किमान 30 वा त्यापेक्षा जास्त  खाटांच्या कक्षासाठी ही मुभा राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा प्रस्तावांना मान्यता देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.