उद्यापासून किराणा, भाजीपाला-फळविक्री, डेअरी, चिकन-मटन, कृषी केंद्रांचे शटर उघडणार!; पण ‘याच’ वेळेत… ‘बुलडाणा लाइव्‍ह’चे कालचे वृत्त ठरले खरे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ‘बुलडाणा लाइव्ह’च्या विश्वासाहर्तवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. काल बुलडाणा लाइव्हने अत्यावश्यक सेवांतील आस्थापनांना लागलेले टाळे उघडले जाणार असल्याचे वृत्त दिले होते. ते खरे ठरले असून, 20 मेच्या सकाळी 6 पासून 1 जूनच्या सकाळी 7 पर्यंत सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने जसे किराणा, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला-फळविक्रीची दुकाने, डेअरी, चिकन-मटन …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ‘बुलडाणा लाइव्‍ह’च्‍या विश्वासाहर्तवर पुन्हा एकदा शिक्‍कामोर्तब झाले  आहे. काल बुलडाणा लाइव्‍हने अत्‍यावश्यक सेवांतील आस्‍थापनांना लागलेले टाळे उघडले जाणार असल्याचे वृत्त दिले होते. ते खरे ठरले असून, 20 मेच्‍या सकाळी 6 पासून 1 जूनच्‍या सकाळी 7 पर्यंत सर्व प्रकारच्‍या जीवनावश्यक वस्‍तूंची दुकाने जसे किराणा, स्‍वस्‍त धान्य दुकाने, भाजीपाला-फळविक्रीची दुकाने, डेअरी, चिकन-मटन दुकाने, स्‍वीटमार्ट, कृषी सेवा केंद्र, बँका-पतसंस्‍था, पेट्रोलपंप, चष्म्‍याची दुकाने, टायर-पंक्‍चरची दुकाने ठराविक वेळेत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी आज, 19 मार्चला काढलेल्या आदेशाद्वारे परवानगी दिली आहे. सलून, ब्‍युटी पार्लर, शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्‍था, क्‍लासेस, उद्याने, मॉर्निंग-इव्हिनिंग वॉक मात्र तूर्त बंद राहणार आहे.

  • सकाळी 7 ते 11 पर्यंत यांचे शटर ओपन ः किराणा, स्‍वस्‍त धान्य दुकाने, भाजीपाला-फळविक्रीची दुकाने, चिकन-मटन दुकाने, स्‍वीटमार्ट, पाळीव प्राणी खाद्यपदार्थांची दुकाने, शहरातील पेट्रोलपंप, सीएनजी पंप,  टायर-पंक्‍चर दुकाने
  • दूध व दूग्‍धजन्य पदार्थ विक्रीसाठी वेळ ः सकाळी 6 ते 9, संध्याकाळी 6 ते 9
  • कृषी सेवा केंद्र व शेती साहित्‍य विक्रीची दुकाने वेळ ः सकाळी 9 ते दुपारी 4
  • बँका व पतसंस्‍था ः सकाळी 10 ते दुपारी 2
  • पावसाळी हंगामाशी संबंधित साहित्‍य विक्रीची दुकाने  ः सकाळी 9 ते दुपारी 4
  • वकील-सीएंची कार्यालये ः सकाळी 10 ते संध्याकाळी 6
  • चष्म्‍याची दुकाने ः सकाळी 9 ते रात्री 8
  • सीएससी सेंटर ः सकाळी 10 ते दुपारी 1

महत्त्वाचे…

  • रेस्‍टॉरंट, भोजनालय, उपहारगृहे, मद्यविक्री घरपोच सेवा फक्‍त सकाळी 7 ते रात्री 8
  • बाजार समिती 23 मेपर्यंत बंद. पुढे टोकन पद्धतीने जिल्हा उपनिबंधक करणार नियोजन.
  • सराफा व्‍यावसायिकांना केवळ दुकाने तपासून येण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत वेळ दिला आहे.

लग्‍नासाठी 2 तास, 25 च वऱ्हाडी!

सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पध्दतीने घरगुती स्वरुपात करण्यात यावा. लग्नात मिरवणूक, जेवणावळी,बँड पथक यांना परवानगी राहणार नाही. लग्न समारंभासाठी केवळ 25 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल व लग्न सोहळा 2 तासांपेक्षा जास्त चालणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.  विवाह सोहळा बेकायदेशीररित्या पार पडणार नाही याची दक्षता शहरी भागात नगरपरिषद मुख्यधिकारी आणि ग्रामीण भागात गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी घ्यावी. लग्न समारंभाबाबतचे नियोजन व नियंत्रण संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था,पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची राहील.

आठवडे बाजार बंदच

आठवडी बाजार बंद राहतील. बॅटरी, इन्व्हर्टर, युपीएस आदी साहित्याची दुकाने आरोग्य यंत्रणेच्या अत्यावश्यक कामासाठी उघडता येतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत दुकान उघडून मालाची विक्री करता येणार नाही.

सिनेमागृहे बंदच

सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय नाटयगृहे, कलाकेंद्र,प्रेषक गृहे, सभागृहे संपूर्णत: बंद राहील.

आरोग्‍य सेवा  24 तास

सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशु चिकित्सा सेवा त्यांच्‍या नियमित वेळेनुसार सुरु राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु राहतील.

गॅस सिलिंडर केवळ घरपोच

गॅस एजन्सीज मार्फत घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण सकाळी 7  ते सायंकाळी 6 या वेळेत करण्यात यावे. परंतु ग्राहकांनी गॅस एजन्सीमध्ये प्रत्यक्ष येऊन गॅस नोंदणी करण्यास अथवा सिलिंडर घेण्यास प्रतिबंध राहील. गॅस एजन्सी येथे ग्राहक आढळून आल्यास संबंधित एजन्सी कारवाईस पात्र राहील.

शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी बंदच

सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात येत आहेत. निवेदन, अर्ज केवळ ऑनलाइन पध्दतीने स्वीकारण्यात येतील.

इ कॉमर्स सेवा सुरू पण…

ई कॉमर्स मार्फत घरपोच सेवा सुरू राहतील. दुकानदार, हॉटेल यांच्‍या मार्फत घरपोच सेवा पुरविणाऱ्या कामगारांकडे ग्राहकांच्या घरी जाताना बिल व संबंधित दुकानदारामार्फत देण्यात येणार ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. कर्मचाऱ्यांना निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. या अहवालाची वैधता 7 दिवसांकरीता असेल.

सार्वजनिक वाहतूक सेवा फक्‍त अत्‍यावश्यकसाठीच…

सर्व सार्वजनिक तसेच खासगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने यांची वाहतूक नागरिकांना फक्त अत्यावश्यक कामासाठीच अनुज्ञेय राहील. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. रुग्णांकरिता रिक्षा व खासगी वाहनांस परवानगी राहील. याबाबतीत नियंत्रण व नियोजनाची जबाबदारी पोलीस वाहतूक शाखेकडे राहील.

जिल्ह्याच्‍या सीमा सीलच

जिल्ह्याच्‍या सर्व सीमा सील असून, मालवाहतुक व रुग्ण वाहतूक करणाऱ्या वाहनास व शासकीय वाहनास केवळ बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश देण्यात येईल. याकरिता वेगळ्या स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. अत्यावश्यक वेळेस जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा यांच्‍याकडून रितसर परवानगी प्राप्त करून घ्यावी.