झालेरे बाबा 5 शहरे कंटेन्मेंट झोन! रात्री कडक संचारबंदी!! अत्यावश्यक दुकाने दुपारी 3 पर्यंतच, डेअरी 2 टप्प्यांत, ‘बुलडाणा लाईव्ह’चे वृत्त तंतोतंत खरे!

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन लागू झाल्यापाठोपाठ आता 5 शहरे कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आली आहेत. या शहरात अत्यावश्यक दुकाने 3 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा असून, डेअरी 2 टप्प्यांत सुरू राहील. रात्री 8.30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत कडक संचारबंदी राहणार आहे. याचाच अर्थ या 5 शहरांत 1 मार्चपर्यंत …
 

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन लागू झाल्यापाठोपाठ आता 5 शहरे कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आली आहेत. या शहरात अत्यावश्यक दुकाने 3 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा असून, डेअरी 2 टप्प्यांत सुरू राहील. रात्री 8.30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत कडक संचारबंदी राहणार आहे. याचाच अर्थ या 5 शहरांत 1 मार्चपर्यंत संचारबंदी व लॉकडाऊन अशी दुहेरी उपाययोजना लागू राहणार आहे. बुलडाणा, चिखली, खामगाव, मलकापूर व देऊळगावराजा या शहरांचा यात समावेश आहे.
सलग 3 दिवस कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 200 च्या पार गेल्यावर काल हा आकडा 301 वर स्थिरावला. या पाठोपाठ आज 22 तारखेला विक्रमी तब्बल 350 रुग्ण आढळले. यातही बुलडाणा, मलकापूर, चिखली, देऊळगाव राजा व खामगाव या शहरातील रुग्ण संख्या गंभीर असल्याचे दिसून येते. यामुळे या शहरांना कंटेन्मेंट झोन अर्थात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचा अंतरिम इलाज (उपाय) जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध होता. यावर आज सकाळपासून प्रशासकीय पातळीवर चिंतन-मनन झाल्यावर शेवटी कंटेन्मेंटचा निर्णय फायनल करण्यात आला. दुपारी 3 च्या आसपास यावर कर्तव्यकठोर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी शिक्‍कामोर्तब केले. त्‍यामुळे आता बुलडाणा, चिखली, खामगाव, मलकापूर व देऊळगावराजा या शहरांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

असे राहणार चित्र

  • जीवनाश्यक दुकाने, किराणा, भाजीपाला , औषधी दुकाने, रेशन दुकान, पीठ गिरण्या सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू.
    दूध विक्रेते व वितरण केंद्र सकाळी 6 दुपारी 3 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 8.30 वाजेदरम्यान सुरू.
  • या क्षेत्रात रात्री 8.30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार.
  • क्षेत्रातील सर्व उद्योग सुरू राहणार.
  • अत्यावश्यक सेवेतील विभाग वगळून इतर कार्यालयांत 15 टक्के कर्मचारी राहणार उपस्थित.
  • हॉटेल्समधून फक्त पार्सल सुविधा.
  • तहसीलदाराच्या परवानगीने लग्न व वधूवरासह 25 जणांना मंजुरी.
  • मालवाहतूक सुरूच राहणार.
  • भाजीपालाची हर्रासी पहाटे 3 ते सकाळी 6 वाजेदरम्यान. फक्त किरकोळ विक्रेत्यांनाच हजर राहता येणार.