ब्रेकिंग! भावी सरपंचांची प्रतीक्षा संपली!! नव्याने निघाले 22 ग्रामपंचायतींचे आरक्षण

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुमारे 1 महिन्यापासून जीव टांगणीला लागलेल्या 22 ग्रामपंचायतींमधील इच्छुक सदस्याची दीर्घ व डोकेदुखी ठरलेली प्रतीक्षा आज, 4 मार्चला संपलीय! या ठिकाणचे सरपंचपदाचे आरक्षण नव्याने काढण्यात आले. यामुळे आता नव्या दमाने इच्छुक कामाला भिडले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्यानंतर …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सुमारे 1 महिन्यापासून जीव टांगणीला लागलेल्या 22 ग्रामपंचायतींमधील इच्छुक सदस्याची दीर्घ व डोकेदुखी ठरलेली प्रतीक्षा आज, 4 मार्चला संपलीय! या ठिकाणचे सरपंचपदाचे आरक्षण नव्याने काढण्यात आले. यामुळे आता नव्या दमाने इच्छुक कामाला भिडले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.

जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्यानंतर 18 जानेवारीला निकाल लागून सदस्य ठरले. यानंतर 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान कमीअधिक 493 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच निवडण्यात आले. त्यांनी थाटात कारभार स्वीकारून कामकाज देखील सुरू केले. दुसरीकडे 33 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा फैसला अगोदर काढलेल्या आरक्षणामुळे होऊ शकला नाही. आज 22 ठिकाणची आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुपारी 12 वाजता सुरू झालेल्या या सोडतीला आरडीसी दिनेश गीते, नायब तहसीलदार (निवडणूक कक्ष) सुनील आहेर यांच्‍यासह संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्‍यासह अव्वल कारकून राम जाधव, स्वाती पुरी, मनीषा पडोळ हजर होते. रूही दाभेराव या 6 वर्षीय बलिकेच्या हस्ते सोडत काढण्यात आली.

काढण्यात आलेले आरक्षण असे ः

जवळा बाजार ओबीसी, माळेगाव गौड अ.जा. महिला, अलमपूर ओबीसी महिला (ता. नांदुरा), पुन्हई एससी महिला, कोथळी एससी महिला, अंतरी ओबीसी, टाकळी वाघजल ओबीसी महिला (ता.मोताळा), वरवट खंडेराव ओबीसी महिला, पातुर्डा खुर्द ओबीसी महिला, रुधाना ओबीसी, तामगाव ओबीसी महिला, आलेवाडी एसटी महिला (ता. संग्रामपूर), आरेगाव एससी (ता. मेहकर), वरखेड एससी (ता. मलकापूर), भोगावती ओबीसी महिला, दिवठाणा, ओबीसी महिला (ता. चिखली), आडोल बुद्रुक एससी महिला, वडशिंगी ओबीसी (ता. जळगाव जामोद), अजीसपूर ओबीसी महिला (ता. बुलडाणा), पिंपरखेड ओबीसी महिला (ता. सिंदखेड राजा), गोत्रा ओबीसी (ता. लोणार), गवंडाळा एससी महिला (ता. खामगाव).