‘ब्रेक द चेन’ अधिक कडक! मोठ्या दंडाची तरतूद! खासगी वाहनांना आंतर शहर व जिल्हा वाहतुकीस मनाई; ‘लग्‍न’सोहळ्यावाल्यांनो, तुम्‍ही तर ही बातमी वाचाच….

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यातील निर्बंध अधिकच कडक करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ पूर्वीप्रमाणेच सकाळी 7 ते 11 अशी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र इतर निर्बंध अधिकच कडक करण्यात आले असून अनेक बाबतीत मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य शासनाने राज्यातील कोरोनाचा वाढता धोका …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यातील निर्बंध अधिकच कडक करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ पूर्वीप्रमाणेच सकाळी 7 ते 11 अशी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र इतर निर्बंध अधिकच कडक करण्यात आले असून अनेक बाबतीत मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

यापूर्वी राज्य शासनाने राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता कडक निर्बंधवजा निर्देश दिले. कोरोना प्रसार व नागरिक बाधित होण्याचा वेग पाहता आपात्कालीन पाऊले उचलणे आवश्यक असल्याचे नमूद करून 1 मेपर्यंत सुधारित कडक निर्बंध लागू करण्याच्या निर्णयाप्रत शासन आले आहे. या गाईडलाईन लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती प्राधिकरणचे अध्यक्ष एस. रामामूर्ती यांनी आज 22 एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा आदेश निर्गमित केले. तत्‍पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्‍या मार्गदर्शनात प्रभारी आरडीसी भूषण अहिरे, गृह विभागाचे नायब तहसीलदार पी. के. करे आदींनी त्यावर  दिवसभर विचारमंथन केले.

ठळक मुद्दे…

  • अत्यावश्यक सेवा अंतर्गतची दुकानांची आधीप्रमाणेच सकाळी 7 ते 11 वाजे दरम्यान
  • केंद्रीय, शासकीय कार्यालयांत 15 टक्के उपस्थिती
  • जीवनावश्यक सेवा अंतर्गतच्या कार्यालयात 50 टक्के उपस्थिती ,पण परवानगीने 100 टक्के हजेरीस मुभा
  • बससेवा सुरू, पण उभ्याने प्रवास नाही
  • खासगी प्रवासी गाड्यांना 50 टक्के क्षमतेसह प्रवास सुविधा
  • ट्रॅव्हल्सला 50 टक्‍क्‍यांसह परवानगी, पण शहरात 2 पेक्षा जास्त थांबे नको, स्टॉपवर उतरल्यावर प्रवाशांच्या हातावर 14 दिवस होम क्‍वारंटाइनचा शिक्‍का मारणे बंधनकारक, थर्मल स्कॅनरने तपासणी ,लक्षणे आढळल्यास रॅपिड टेस्‍ट
  • बँक, एटीएम, विमा सेवा सकाळी 10 ते दुपारी 2 सुरू
  • लग्नासंबंधी नियम तोडणाऱ्या कुटुंबास 50 हजारांचा दंड