भंडारा अग्निकांडामुळे बुलडाण्यातही सतर्कता!; कोविड सेंटरमधील कर्मचार्‍यांना अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भंडारा अग्निकांड प्रकरणाच्या धर्तीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली असून, शासकीय कोविड सेंटर स्त्री रुग्णालय येथे आरोग्य कर्मचार्यांना फायर फाइटरचे प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. सचिन वासेकर यांच्या देखरेखीखाली हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी रुग्णालयात कोणत्याही कक्षात अचानक आग लागली तर तात्काळ कर्मचार्याने काय करावे, आग कशी आटोक्यात आणावी त्यावर कसे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भंडारा अग्निकांड प्रकरणाच्या धर्तीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली असून, शासकीय कोविड सेंटर स्त्री रुग्णालय येथे आरोग्य कर्मचार्‍यांना फायर फाइटरचे प्रशिक्षण देण्यात आले.

डॉ. सचिन वासेकर यांच्या देखरेखीखाली हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी रुग्णालयात कोणत्याही कक्षात अचानक आग लागली तर तात्काळ कर्मचार्‍याने काय करावे, आग कशी आटोक्यात आणावी त्यावर कसे नियंत्रण करावे, त्यापासून सुरक्षा, बचाव याविषयी हे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार, ब्रदर, डॉक्टर्स आदींनी भाग घेतला. व्यवस्थापक संदीप आढाव, आरटीपीसीआर लॅबचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, डॉ. असलम जमाल, डॉ. ऋषिकेश देशमुख यांची उपस्थिती होती.