भंडारी येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू; जिल्ह्यात नवे 13 बाधित, वाचा कोणत्‍या गावात किती…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 28 जूनला नवे 13 कोरोनाबाधित समोर आले असून, 24 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचारादरम्यान बुलडाण्यातील स्त्री रुग्णालयात भंडारी (ता. सिंदखेड राजा) येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 992 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी …
 
भंडारी येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू; जिल्ह्यात नवे 13 बाधित, वाचा कोणत्‍या गावात किती…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 28 जूनला नवे 13 कोरोनाबाधित समोर आले असून, 24 रुग्‍णांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. उपचारादरम्यान बुलडाण्यातील स्‍त्री रुग्णालयात भंडारी (ता. सिंदखेड राजा) येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 992 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 979 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 13 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 11 व रॅपिड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 369 तर रॅपिड टेस्टमधील 610 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 3, तालुका : नांद्राकोळी 1, शेगाव शहर : 2, सिंदखेड राजा तालुका : चांगेफळ 1, चिखली तालुका : शेलसूर 1, मेहकर तालुका : भोसा 1, लोणार तालुका : शेलगाव जहागीर 1, खामगाव शहर : 1, खामगाव तालुका : तांबुलवाडी 1, परजिल्हा माहोरा ता. जाफराबाद 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 13 रुग्ण आढळले आहेत.

110 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आज 24 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 567496 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85841 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1103 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 86612 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 110 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 661 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.