भयंकर… कापडीत पिशवीत बाळ आणून टाकले ‘सेवासंकल्‍प’च्‍या गेटसमोर!; चिखली तालुक्‍यातील घटना

अमडापूर (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे माणुसकीला लाजवणारा एक भयंकर प्रकार आज, 30 एप्रिलला सकाळी समोर आला आहे. अवघ्या दोन तासांच्या बाळाला कुणीतरी कापडी पिशवीत टाकून सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या गेटसमोर आणून टाकले. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सेवा संकल्प प्रतिष्ठानचे सचिव …
 

अमडापूर (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्‍यातील पळसखेड सपकाळ येथे माणुसकीला लाजवणारा एक भयंकर प्रकार आज, 30 एप्रिलला सकाळी समोर आला आहे. अवघ्या दोन तासांच्‍या बाळाला कुणीतरी कापडी पिशवीत टाकून सेवा संकल्‍प प्रतिष्ठानच्‍या गेटसमोर आणून टाकले. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी अज्ञात व्‍यक्‍तीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सूत्रांच्‍या माहितीनुसार, सेवा संकल्प प्रतिष्ठानचे सचिव नंदकुमार पालवे यांनी या घटनेबद्दल अमडापूर पोलिसांना सकाळी साडेअकराच्‍या सुमारास माहिती दिली. त्‍यांनी सांगितले, की 29 व 30 एप्रिलच्या मध्यरात्री 12 ते 2 वाजेदरम्यान कुणीतरी सेवा संकल्पच्‍या गेटसमोर स्‍त्री जातीचे नवजात अर्भक एका पिशवीमधे आणून टाकले. कुत्र्यांच्‍या भुंकण्याच्या आवाजाने जाग येऊन बाहेर आलो असता महालक्ष्मी किराणाच्या कापडी पिशवीत अंदाजे तास- दोन तासांआधी जन्मलेले अर्भक आढळले. या अर्भकाला श्वास घ्यायला त्रास होत होता व नाळही व्यवस्‍थित बंद करून कापलेली नव्हती. त्यामुळे बाळ काळेनिळे पडण्यास सुरुवात झाली होती. तातडीने या अर्भकाला सेवा संकल्पच्या रुग्णवाहिकेतून चिखली येथील डॉ. शिवशंकर खेडेकर यांच्या संतकृपा बालरुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केले आहे. अर्भक आढळले तेव्‍हा परिसरात कोणीही नातेवाइक आढळले नाहीत, असे श्री. पावले यांनी सांगितले. बालकल्याण समितीकडे हे प्रकरण सोपविण्यात आले असून, सध्या बाळाची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे श्री. पालवे यांनी बुलडाणा लाइव्‍हला सांगितले.