भयंकर… सेनेच्‍या माजी तालुकाप्रमुखांना टवाळखोर कॉल करून देताहेत त्रास!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांपासून मलकापूर परिसरातील काही टवाळखोर मुले आपल्या मोबाइल नंबरवर कॉल करून देत आहेत. त्यामुळे माझी मानसिकता बिघडवण्यासाठी ते कारणीभूत असल्याची तक्रार शिवसेनेचे मलकापूर माजीतालुका प्रमुख एकनाथ डवले यांनी शहर पोलीस ठाण्यात केली आहे.तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत विविध 40 ते 50 नंबर्सवरून आपल्याला वेळी- अवेळी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांपासून मलकापूर परिसरातील काही टवाळखोर मुले आपल्या मोबाइल नंबरवर कॉल करून देत आहेत. त्यामुळे माझी मानसिकता बिघडवण्यासाठी ते कारणीभूत असल्याची तक्रार शिवसेनेचे मलकापूर माजीतालुका प्रमुख एकनाथ डवले यांनी शहर पोलीस ठाण्यात केली आहे.
तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत विविध 40 ते 50 नंबर्सवरून आपल्याला वेळी- अवेळी कॉल येत आहेत. त्यावरून विविध प्रकारचे प्रश्न विचारतात. यापूर्वी सुद्धा त्यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे डवले यांनी म्हटले आहे. टवाळखोरांच्या या त्रासामुळे मानसिक व कौटुंबिक स्थिती बिघडली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना सत्तेत असताना शिवसेनेच्‍याच माजी पदाधिकाऱ्याला अशाप्रकारे त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर सामान्‍यांचे काय, असा प्रश्न उपस्‍थित होत आहे.