भरदिवसा बुलडाण्यात घर फोडून दागिने लांबवले!; नांदुरा, देऊळगाव राजापाठोपाठ बुलडाणा लक्ष्य!!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा, देऊळगाव राजा येथील चोरीच्या घटना ताज्या असतानाच बुलडाणा शहर तर चोरट्यांनी हद्दच केली. आज, 2 फेब्रुवारीला भरदिवसा सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान चोरट्यांनी गुरुकृपानगरमध्ये महिलेचे घर फोडून 45 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.सौ. सविता गुलाब मापारी (45, रा. गुरुकृपानगर स्काऊट गाईड कार्यालयामागे) यांचे घर चोरट्यांनी …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा, देऊळगाव राजा येथील चोरीच्या घटना ताज्या असतानाच बुलडाणा शहर तर चोरट्यांनी हद्दच केली. आज, 2 फेब्रुवारीला भरदिवसा सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान चोरट्यांनी गुरुकृपानगरमध्ये महिलेचे घर फोडून 45 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
सौ. सविता गुलाब मापारी (45, रा. गुरुकृपानगर स्काऊट गाईड कार्यालयामागे) यांचे घर चोरट्यांनी फोडले आहे. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली, की त्या घरी नसताना त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले नगदी 35 हजार रुपये, एक सोन्याची अंगठी वजन 3 ग्रॅमची व कानातील टॉप्स वजन 3 ग्रॅम, चांदीच्या चैन पट्ट्या असा एकूण एकूण 45 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. त्या दुपारी घरी परतल्या तेव्हा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लगेचच बुलडाणा शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास ए.एस.आय. रमेश कानडजे करीत आहेत.