भरदिवसा स्कुटीच्या डिक्कीतून लांबवले 50 हजार!; चिखली शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दवाखान्याबाहेर उभ्या स्कुटीच्या डिक्कीतून 50 हजार रुपये लांबवल्याची घटना चिखली येथे काल, 15 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.धनंजय नामदेव इंगळे (31, रा. उत्रादा, ता. चिखली) यांनी यासंदर्भात चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. काल धनंजय इंगळे यांनी चिखली शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून 50 हजार रुपये काढले. दरम्यान त्यांना …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दवाखान्याबाहेर उभ्या स्कुटीच्या डिक्कीतून 50 हजार रुपये लांबवल्याची घटना चिखली येथे काल, 15 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.
धनंजय नामदेव इंगळे (31, रा. उत्रादा, ता. चिखली) यांनी यासंदर्भात चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. काल धनंजय इंगळे यांनी चिखली शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून 50 हजार रुपये काढले. दरम्यान त्यांना थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने ते बँकेच्या जवळच असलेल्या गंगाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले. त्यांची स्कुटी त्यांनी गंगाई हॉस्पिटलसमोर उभी केली होती. गाडीच्या डिक्कीत त्यांनी 50 हजार रुपये ठेवले. दहा मिनिटांतच धनंजय यांच्यावर उपचार झाल्याने त्यांनी हॉस्पिटलमध्येच असलेला त्यांचा भाऊ सोपान इंगळे याला डिक्कीतून 50 हजार रुपये सांगितले. सोपानने दवाखान्याबाहेर उभ्या असलेल्या स्कुटीची डिक्की उघडली असता त्यात पैसे दिसले नाहीत.
सीसीटीव्ही तपासले
या घटनेनंतर गंगाई हॉस्पिटलचे मालक डॉ. पंढरी इंगळे यांनी सीसीटीव्ही तपासले असता धनंजय इंगळे यांचा पाठलाग करत तिघे जण एका मोटारसायकलवरून हॉस्पिटल समोर आल्याचे दिसले. धनंजय यांच्यावर उपचार सुरू असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी स्कुटीची डिक्की मोडून त्यातून 50 हजार रुपये पळवल्याचे स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.