भरधाव आयशरची मोटारसायकला धडक; एसटी बसचालक ठार; चिखली तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव आयशरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत 1 जण जागीच ठार झाल्याची घटना आज, 21 मे रोजी अंचरवाडी फाट्याजवळ सकाळी 8 च्या सुमारास घडली. शेख अफसर शेख अनफ (रा. लोणार गल्ली, देऊळगाव राजा) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव राजा ते चिखली रस्त्यावर दिवसाआड अपघाताची मालिका …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव आयशरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत 1 जण जागीच ठार झाल्याची घटना आज, 21 मे रोजी अंचरवाडी फाट्याजवळ सकाळी 8 च्या सुमारास घडली.

शेख अफसर शेख अनफ (रा. लोणार गल्ली, देऊळगाव राजा) असे ठार झालेल्या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव राजा ते चिखली रस्त्यावर दिवसाआड अपघाताची मालिका गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अंचरवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या वर्षीपासून अपूर्ण आहे. त्यामुळे या फाट्यालगत रोडवरून जाणारी वाहतूक नेहमी जीवघेणी ठरत आहे.

एकतर्फी वाहतुकीमुळे चिखली आगार विभागात एसटी चालक असलेले शेख अफसर शेख अनफ मोटारसायकलने (क्र.एमएच 28 एल 5411) चिखलीवरून घराकडे जात असताना जालन्‍यावरून मलकापूरकडे भरधाव जाणाऱ्या आयशरने (क्र. एमएच 21- 8633) त्‍यांना उडवले. यात शेख अफसर यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. आयशर परमेश्वर टकले हा चालवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयशर हा जालना येथून माचीसचा माल भरून मलकापूरकडे जात असल्याचे सांगण्यात आले.