भरधाव ऑटोरिक्षा उलटला, सासरवाडीला निघालेला व्‍यक्‍ती ठार, पत्‍नी, मुलगी, साला, चालक जखमी, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धावता ऑटोरिक्षा अचानक नादुरुस्त होऊन उलटला. यात एक जण ठार तर चौघे जखमी झाले. ही घटना 25 मे रोजी सकाळी 11 च्या सुमारास चितोडा-पळशी रस्त्यावर घडली. प्रकाश गोपाल धोत्रे (35, रा. चितोडा, ता. खामगाव) हे पत्नी व मुलीसोबत सासरवाडीवरून त्यांना घ्यायला आलेल्या ऑटोरिक्षातून चिंचपूरला जात होते. त्यांना …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः धावता ऑटोरिक्षा अचानक नादुरुस्‍त होऊन उलटला. यात एक जण ठार तर चौघे जखमी झाले. ही घटना 25 मे रोजी सकाळी 11 च्‍या सुमारास चितोडा-पळशी रस्‍त्‍यावर घडली.

प्रकाश गोपाल धोत्रे (35, रा. चितोडा, ता. खामगाव) हे पत्‍नी व मुलीसोबत सासरवाडीवरून त्यांना घ्यायला आलेल्या ऑटोरिक्षातून चिंचपूरला जात होते. त्यांना घेण्यासाठी धोत्रे यांचा साला चितोडा येथे ऑटो ड्रायव्हरसोबत आला होता. चितोडा- पळशी रस्त्याने जात असताना धावत्या ऑटोत अचानक बिघाड झाल्याने ऑटो रस्त्याने उलटला. यात प्रकाश धोत्रे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्‍नी, मुलगी, साला व ऑटो ड्रायव्हर सुद्धा या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. तपास पोलीस कर्मचारी राजेश गाडेकर करत आहेत.