भरधाव कारच्या धडकेत मलकापूरचा युवक ठार

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव कारने धडक दिल्याने युवक गंभीर झाला.उपचारादरम्यान बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात आज, 25 मार्चला सकाळी 11 च्या सुमारास मलकापूर- बुलडाणा रोडवरील ओम किराणा दुकानाजवळ घडला. संतोष प्रकाश बुडुकले (35, रा. मंगल गेट परिसर, मलकापूर) मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. संतोष दुचाकीने (क्र. MH04 BP …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव कारने धडक दिल्याने युवक गंभीर झाला.उपचारादरम्यान बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात आज, 25 मार्चला सकाळी 11 च्या  सुमारास मलकापूर- बुलडाणा रोडवरील ओम किराणा दुकानाजवळ घडला. संतोष प्रकाश बुडुकले (35, रा. मंगल गेट परिसर, मलकापूर) मृत्‍यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

संतोष दुचाकीने (क्र. MH04 BP 8863) बसस्थानकाकडून तहसील चौकाकडे जात होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव कारने (क्रमांक MH 28 AN 2389) च्या चालकाने ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीस जबर धडक दिली. यात संतोष गंभीररित्या जखमी झाला. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे हलविण्यात आले. मात्र डोक्याला जबर मार लागल्याने व अतिरक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान त्‍याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील असा परिवार आहे. त्याच्या अपघाती निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.