भरधाव टिप्परने दुचाकीला उडवले, तरुण ठार; सिंदखेड राजा तालुक्‍यात दुर्घटना

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव टिप्परने उडवल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुंबई- नागपूर महामार्गावरील दुसरबीड येथील ग्रीनपर्ल दूध डेअरीजवळ आज, ३ ऑक्टोबरला दुपारी दोनच्या सुमारास घडली. शेख चांद शेख राशद (२४, रा. दुसरबीड) असे मृतकाचे नाव आहे. सिंदखेड राजामार्गे जड वाहतूक बंद असताना अवैधरित्या सुरू असलेल्या वाहतुकीने एकाचा …
 
भरधाव टिप्परने दुचाकीला उडवले, तरुण ठार; सिंदखेड राजा तालुक्‍यात दुर्घटना

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव टिप्परने उडवल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना मुंबई- नागपूर महामार्गावरील दुसरबीड येथील ग्रीनपर्ल दूध डेअरीजवळ आज, ३ ऑक्‍टोबरला दुपारी दोनच्‍या सुमारास घडली. शेख चांद शेख राशद (२४, रा. दुसरबीड) असे मृतकाचे नाव आहे. सिंदखेड राजामार्गे जड वाहतूक बंद असताना अवैधरित्या सुरू असलेल्या वाहतुकीने एकाचा बळी घेतल्याने ग्रामस्‍थ संतप्‍त झाले आहेत.

अपघातानंतर टिप्परचालक तढेगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दोन किलोमीटर अंतरावर टिप्पर उभे करून पसार झाला. खडकपूर्णा नदीवर मोठा पूल आहे. मुंबईहून नागपूरकडे जाण्यासाठी कमी अंतराचा हा मार्ग समजला जातो. दुसरबीडमार्गे जाणाऱ्या रोडवरून टिप्पर, एलएमव्ही, लोडेड ट्रक, ट्रॅक्‍टर, ट्रॉली विशेषत: लांब पल्ल्याच्या जड वाहनांची संख्या वाढली आहे. नादुरुस्त पुलामुळे या मार्गावरील एस. टी. बसेस अद्यापही शासनाकडून बंद करण्यात आली असून, तढेगाव, देऊळगावमही, देऊळगाव राजामार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र शासनादेश झुगारून एस.टी. बसेस वगळता समृद्धी महामार्गाच्या जड वाहनांसह इतर अवजड वाहने सर्रास धावत आहेत. आज दुपारी भरधाव टिप्परने (क्र. एमएच२८ बीबी १२९९) दुचाकीला (क्र.एमएच १२ सीएम ९३१४) उडवले. यात शेख चांद जागीच ठार झाला.