भरधाव टिप्परने दुचाकीला उडवले, 1 ठार, 1 गंभीर जखमी; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव टिप्परने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण ठार तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. ही घटना शेगाव- वरवट बकाल रस्त्यावर 11 मार्चला दुपारी अडीचच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी आज, 15 मार्चला मृतकाच्या मुलाच्या तक्रारीवरून टिप्परचालकाविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाळकृष्ण पहूरकर …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव टिप्परने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण ठार तर दुसरा व्‍यक्‍ती गंभीर जखमी झाला होता. ही घटना शेगाव- वरवट बकाल रस्‍त्‍यावर 11 मार्चला दुपारी अडीचच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी आज, 15 मार्चला मृतकाच्‍या मुलाच्‍या तक्रारीवरून टिप्परचालकाविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

बाळकृष्ण पहूरकर (रा. भिलखेड, ता. संग्रामपूर) असे ठार झालेल्या व्‍यक्‍तीचे नाव असून, राजेश्वर भोसले गंभीर जखमी झाले आहेत. पहुरकारहे दुचाकीने (एमएच 28 एआय 1811) राजेश्वर मनोहर कडूसले यांच्यासह शेगाव येथून वरवट बकालकडे येत होते. त्‍याचवेळी समोरून भरधाव येणाऱ्या टिप्परने (क्र. एमएच 28 बीबी 1643)  त्‍यांना उडवले. अपघातानंतर टिप्परचालक फरारी झाला. याप्रकरणी बाळकृष्ण पहुरकर यांच्या राष्ट्रपाल या मुलाने शेगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. तपास ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी यांच्‍या मार्गदर्शनाखाली सुरेंद्र सिंग चव्हाण करत आहेत.