भरधाव ट्रकने पादचाऱ्याला चिरडले!; डोक्‍यावरूनच चाक गेल्याने ओळखही पटेना!!; आंबोडा फाट्याजवळील घटना

नांदुरा ( प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव ट्रकच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना नांदुरा- खामगाव रोडवरील आंबोडा फाट्यानजीक साखर कारखान्याजवळ आज, 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान घडली. पादचाऱ्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याची ओळख वृत्त लिहीपर्यंत पटू शकली नाही. संध्याकाळी 5.30 वाजेदरम्यान जीजे 04 एडब्ल्यू 3671 क्रमांकाच्या खामगावकडून नांदुरा येणाऱ्या भरधाव …
 
भरधाव ट्रकने पादचाऱ्याला चिरडले!; डोक्‍यावरूनच चाक गेल्याने ओळखही पटेना!!; आंबोडा फाट्याजवळील घटना

नांदुरा ( प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव ट्रकच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना नांदुरा- खामगाव रोडवरील आंबोडा फाट्यानजीक साखर कारखान्‍याजवळ आज, 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान घडली.

पादचाऱ्याच्‍या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्‍याची ओळख वृत्त लिहीपर्यंत पटू शकली नाही. संध्याकाळी 5.30 वाजेदरम्यान जीजे 04 एडब्ल्यू 3671 क्रमांकाच्या खामगावकडून नांदुरा येणाऱ्या भरधाव ट्रकने आंबोडाजवळ पादचारी व्‍यक्‍तीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. वृत्त लिहीपर्यंत जलंब पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.