भरधाव दुचाकीच्या धडकेने वृद्धाचा जागीच मृत्यू; शेगावजवळील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाळापूर रोडवरील अंबर हॉटेलजवळ भरधाव दुचाकीने धडक दिल्याने 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 23 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. आनंद सागर रोडवर नथुजी राघोजी पन्नासे हे 23 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास रस्त्यावरून जात असताना मोटरसायकलने (क्र.एमएच 30 एई 1908) त्यांना धडक दिली. …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बाळापूर रोडवरील अंबर हॉटेलजवळ भरधाव  दुचाकीने धडक दिल्याने 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 23 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहाच्‍या सुमारास घडली. आनंद सागर रोडवर नथुजी राघोजी पन्नासे हे 23 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहाच्‍या सुमारास रस्त्यावरून जात असताना मोटरसायकलने (क्र.एमएच 30 एई 1908) त्‍यांना धडक दिली. यात पन्‍नासे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद विश्वेश्वर नथुजी पन्‍नासे याने काल, 24 एप्रिलला दिली. त्‍यावरून दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकाँ विजय टेकाळे करीत आहेत.