भरधाव दुचाकी मागून ट्रकमध्ये घुसली, तरुण ठार, 1 गंभीर जखमी; खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रकला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना खामगाव एमआयडीसी भागातील बिरला कॉटसीन कंपनीजवळ आज, 13 मार्चच्या दुपारी अडीचच्या सुमारास घडली.अंकित अढाव (18, रा. सुटाळा बुद्रूक) असे ठार झालेल्याचे नाव आहे. शुभम भोपळे (18, रा. सुटाळा बुद्रूक) असे गंभीर जखमीचे …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ट्रकला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना खामगाव एमआयडीसी भागातील बिरला कॉटसीन कंपनीजवळ आज, 13 मार्चच्‍या दुपारी अडीचच्‍या सुमारास घडली.
अंकित अढाव (18, रा. सुटाळा बुद्रूक) असे ठार झालेल्याचे नाव आहे. शुभम भोपळे (18, रा. सुटाळा बुद्रूक) असे गंभीर जखमीचे नाव आहे. दोघे दुचाकीने (क्रमांक MH 28 BH 3122) शेतात जात होते. अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटून दोघे उभ्या ट्रकला (क्र MH 40 BL 5959) मागून धडकले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्वरित नागरिकांनी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना अकोला येथे रेफर केले. यातील अंकितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर शुभमवर उपचार सुरू आहेत.