भरपावसातही 4 हजार मजूर कामांवर!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अधूनमधून अकारण टीकेची धनी ठरणारी रोजगार हमी योजना किती उपयुक्त आहे याचा प्रत्यय दीर्घ लॉकडाऊनमध्ये व सध्याच्या ऐन पावसाळ्यातही येत आहे. लॉकडाऊनमध्ये तब्बल 30 हजार 454 कुटुंबांना रोजगार पुरविणाऱ्या “रोहयो’च्या कामावर सध्याही भरपावसात 4 हजारांवर मजूर काम करत असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे दीर्घ काळ लागू असलेल्या लॉकडाउनमुळे …
 
भरपावसातही 4 हजार मजूर कामांवर!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अधूनमधून अकारण टीकेची धनी ठरणारी रोजगार हमी योजना किती उपयुक्त आहे याचा प्रत्यय दीर्घ लॉकडाऊनमध्ये व सध्याच्या ऐन पावसाळ्यातही येत आहे. लॉकडाऊनमध्ये तब्बल 30 हजार 454 कुटुंबांना रोजगार पुरविणाऱ्या “रोहयो’च्या कामावर सध्याही भरपावसात 4 हजारांवर मजूर काम करत असल्याचे चित्र आहे.

कोरोनामुळे दीर्घ काळ लागू असलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला. हजारो जिल्हावासी हे परराज्य वा पर जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात परतले. मात्र गावी परतल्यावर करायचे काय? अन्‌ कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा करायचा?? हे प्रश्न त्यांच्या समक्ष ठाकले. याचे उत्तर अनेकांनी रोहयोच्या कामात शोधले. मागील 1 एप्रिल ते 16 ऑगस्ट 2021 या कालावधीत तब्बल 30 हजार 454 कुटुंबांना मदतीचा हात मिळाला. यामुळे 43 हजार 411 व्यक्तींना गावलागतच रोजगार मिळाला.

285 ग्रामपंचायतींत कामे सुरू
दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यावर व खरीप हंगामात मजुरांची संख्या कमी होते असा अनुभव आहे. मात्र यंदा तो काहीसा चुकीचा ठरलाय! सध्या जिल्ह्यातील 285 ग्रामपंचायत क्षेत्रात रोहयोची विविध कामे सुरू आहे. त्यावर सध्या 4 हजार 52 मजूर काम करत आहे. आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 903 मजुरांना रोजगार मिळाला आहे.