भररस्‍त्‍यात तरुणीसोबत गैरवर्तन!; खामगावात 20 वर्षीय तरुणाचे कृत्‍य, लग्‍न कर म्‍हणून दोन महिन्यांपासून सुरू होता पाठलाग

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाठलाग करून तरुणीला थांबवत रस्त्यावरच तिच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या तरुणाविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी आज, 28 जूनला गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खामगाव शहरातील नांदुरा रोडवर घडला. सुटाळा बुद्रूक येथील 20 वर्षीय तरुणीला मनीष भगवान चोपडे (रा. सुटाळा बुद्रूक) हा मागील दोन महिन्यांपासून त्रास देत आहे. माझ्याशी लग्न कर असे म्हणून …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पाठलाग करून तरुणीला थांबवत रस्त्यावरच तिच्‍यासोबत गैरवर्तन करणाऱ्या तरुणाविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी आज, 28 जूनला गुन्‍हा दाखल केला आहे. हा प्रकार खामगाव शहरातील नांदुरा रोडवर घडला.

सुटाळा बुद्रूक येथील 20 वर्षीय तरुणीला मनीष भगवान चोपडे (रा. सुटाळा बुद्रूक) हा मागील दोन महिन्यांपासून त्रास देत आहे. माझ्याशी लग्न कर असे म्हणून तो तिचा पाठलाग करत होता. 26 जूनला त्याने पाठलाग करून तिला रस्त्यात थांबवले. तिचा हात धरून तू माझ्याशी लग्न कर नाही तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकेन, अशी धमकी दिली. या प्रकाराने घाबरलेल्‍या तरुणीने खामगाव शहर पोलीस ठाणे गाठून मनीषविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्‍याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.