भरोसा येथे घरफोडी, 2 लाखांचा ऐवज लंपास!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घर फोडून चोरट्यांनी 2 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना भरोसा (ता. चिखली) येथे 21 मे रोजी रात्री 11 नंतर घडली. 22 मे रोजी ही घटना समोर आल्यानंतर अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. श्वानपथक, ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भरोसा येथे अंचरवाडी …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घर फोडून चोरट्यांनी 2 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना भरोसा (ता. चिखली) येथे 21 मे रोजी रात्री 11 नंतर घडली. 22 मे रोजी ही घटना समोर आल्यानंतर अंढेरा पोलिसांनी घटनास्‍थळी येत पंचनामा केला. श्वानपथक, ठसेतज्‍ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

भरोसा येथे अंचरवाडी रस्‍त्‍यावर शरद ज्ञानेश्वर थुट्टे यांचे 10 खोल्यांचे घर आहे. 21 मेच्‍या रात्री साडेदहाला सर्व जण झोपी गेले. थुट्टे यांचे आई, वडील, भाऊ वरच्‍या खोलीत तर थुट्टे हे ज्‍या खोलीत चोरी झाली त्‍याच्‍या बाजूच्‍या खोलीत झोपले होते. चोरट्यांनी बाहेर कुणी येऊ नये म्‍हणून खोल्‍यांच्‍या बाहेरील कड्या लावून घेतल्या होत्‍या. रात्री अकरानंतर चोरट्यांनी चोरी केल्याचे सांगण्यात आले. थुट्टे यांची पत्‍नी सकाळी उठली तेव्‍हा घरात चोरी झाल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले. कपाट उघडे होते. त्‍यातील 1 लाख 40 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेलेले होते. कपाटातील लेडीज पर्स शेजारील शेतात फेकलेली दिसून आली. लहान मुलांचे दागिनेही चोरीस गेलेले होते. थुट्टे यांनी अंढेरा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पाहणी केली. ठाणेदार राजवंत आठवले यांच्‍या मार्गदर्शनाखाली ठसेतज्‍ज्ञ, श्वानपथकही बोलावून चोरट्यांचा माग काढण्यात आला. तपास अंढेरा पोलीस करत आहेत.