भरोसा येथे शेड नेट धारकांची कार्यशाळा उत्साहात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेड नेटधारक शेतकऱ्यांसाठी उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयातर्फे भरोसा (ता. चिखली) येथे बिजोत्पादन आणि भाजीपाला उत्पादन, विक्री व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रास्ताविकेत उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी पोकरा अंतर्गत उभारण्यात आलेल्या शेड नेट मध्ये व्यावसायिक दृष्ट्या भाजीपाला उत्पादन करणे, खासगी कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांनी बिजोत्पादन घेणे आणि निर्माण …
 
भरोसा येथे शेड नेट धारकांची कार्यशाळा उत्साहात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेड नेटधारक शेतकऱ्यांसाठी उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयातर्फे भरोसा (ता. चिखली) येथे बिजोत्पादन आणि भाजीपाला उत्पादन, विक्री व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

प्रास्ताविकेत उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी पोकरा अंतर्गत उभारण्यात आलेल्या शेड नेट मध्ये व्यावसायिक दृष्ट्या भाजीपाला उत्पादन करणे, खासगी कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांनी बिजोत्पादन घेणे आणि निर्माण झालेल्या भाजीपाला उत्पादनांची विक्री व्यवस्था बळकट करणे या विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. अनंता सिड्स, प्रा.लि.जालना कार्यकारी संचालक सुभाष धुमाळ यांनी त्यांच्या कंपनी मार्फत राबवत असलेल्या भाजीपाला बिजोत्पादनाची सविस्तर माहिती व त्यातील संधी सांगितल्या. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भाजीपाला बिजोत्पादन घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. सीताई नॅचरल फार्मर फेडरेशनचे संचालक अभिषेक भराड यांनी तयार होणाऱ्या भाजीपाला निर्यातीच्या संधी व वाव या संदर्भात मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी भाजीपाला लागवड कमी खर्चात जास्त उत्पादन काढणे, शेती व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून करणे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी VEGNET वर नोंदणी करणे, गुणवत्तापूर्वक भाजीपाला उत्पादन करून आर्थिक विकास साधणे व हे सर्व करण्याकरता गट शेती, शेड नेट धारक शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक होते. भरोसा येथील गणेश युद्धे, अभिषेक भराड, सुभाष धमाळ, लक्ष्मण खरात यांची प्रमुख उपस्‍थिती होती. सूत्रसंचालन तालुका कृषि अधिकारी अमोल शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रकल्प विशेषज्ञ उमेश जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी मंडळ कृषि अधिकारी अनंता गंभारे, कृषि पर्यवेक्षक किशोर टाले, कृषि सहाय्यक गजानन इंगळे, प्रकल्प विशेषज्‍ज्ञ सोहम बेलोकर, समूह सहाय्यक जयदीप झोरे, प्रशांत सुरूशे, राजेश खरात व सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास शेतकरी बांधवांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला, असे उपविभागीय कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.