भवानी माता मंदिराचे पुजारी टिप्परच्या धडकेत ठार;मलकापुर शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर शहरातील भवानी माता मंदिराचे पुजारी बाळकृष्ण पाठक (79) यांच्या दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. ही घटना काल, 28 फेब्रुवारीला दुपारी 3 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मुंदडा पेट्रोल पंपाजवळ घडली. पाठक सूतगिरणीकडून मलकापूरकडे येत होते. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला टिप्परने मागून जोरदार धडक दिली. घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मलकापूर शहरातील भवानी माता मंदिराचे पुजारी बाळकृष्ण पाठक (79) यांच्या दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. ही घटना काल, 28 फेब्रुवारीला दुपारी 3 च्‍या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मुंदडा पेट्रोल पंपाजवळ घडली.

पाठक सूतगिरणीकडून मलकापूरकडे येत होते. त्‍याचवेळी त्यांच्या दुचाकीला टिप्परने मागून जोरदार धडक दिली. घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातास कारणीभूत ठरलेले टिप्पर ताब्यात घेतले. तपास पीएसआय संजीवनी पुंडगे करत आहेत. पाठक यांच्‍या पश्चात पत्‍नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.