भांडणानंतर घरी परतणारा व्यक्ती एकाएकी कोसळला, जागीच मृत्यू; रोहिणखेडचे 5 जण चौकशीसाठी ताब्यात

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आपसी वादातून झालेल्या भांडणात 50 वर्षीय वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होत नसून, हा खून की हृदयविकाराचा झटका शवविच्छेदनाच्या अहवालाअंतीच स्पष्ट होणार असल्याने धामगणाव बढे पोलिसांनी सध्या 5 जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असले तरी अद्याप कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही. ही घटना रोहिणखेड (ता. मोताळा) येथे …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आपसी वादातून झालेल्या भांडणात 50 वर्षीय वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूचे निश्‍चित कारण स्पष्ट होत नसून, हा खून की हृदयविकाराचा झटका शवविच्छेदनाच्या अहवालाअंतीच स्पष्ट होणार असल्याने धामगणाव बढे पोलिसांनी सध्या 5 जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असले तरी अद्याप कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही. ही घटना रोहिणखेड (ता. मोताळा) येथे आज, 26 जानेवारीच्या सकाळी आठच्या सुमारास घडली.


शेख कदीर शेख रज्जाब (रा. रोहिणखेड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. फारुख शेख मुसा, शाहरुख शेख फारुख, जिया शेख फारुख, हारुण शेख मुसा, रियाज शेख फारुख (सर्व रा. रोहिणखेड) यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तीनशे रुपये देत नसल्याने संशयित पाच जण आणि शेख कदीर यांच्यात रात्रीही भांडण झाले होते.

आज सकाळीही पुन्हा भांडण झाले. त्यानंतर घरी परतत असतानाच ते कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची चर्चाही गावात आहे. घटनेची माहिती मिळताच धामगणाव बढे पो.स्टे चे ठाणेदार चंद्रकांत ममताबादे, सह दुय्यम ठाणेदार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.