भाजपचा संताप फक्‍त घाटाखालीच… घाटावर उदासिनता!

खामगाव (ज्ञानेश्वर ताकोते/भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आक्रमक होणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. यात जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांचाही समावेश आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आज, ६ जुलैला जिल्ह्यात भाजपातर्फे प्रशासनाला निवेदन देत संताप व्यक्त करण्यात आला. मात्र हा संताप व्यक्त घाटाखालीच प्रकर्षाने जाणवला. घाटावर आंदोलनाच्या बाबतीत …
 

खामगाव (ज्ञानेश्वर ताकोते/भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ओबीसींच्‍या राजकीय आरक्षणासाठी आक्रमक होणाऱ्या भाजपाच्‍या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. यात जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांचाही समावेश आहे. या कारवाईच्‍या निषेधार्थ आज, ६ जुलैला जिल्ह्यात भाजपातर्फे प्रशासनाला निवेदन देत संताप व्‍यक्‍त करण्यात आला. मात्र हा संताप व्‍यक्‍त घाटाखालीच प्रकर्षाने जाणवला. घाटावर आंदोलनाच्‍या बाबतीत उदासिनता दिसून आली.

खामगावात पुतळ्याचे दहन
खामगाव शहरातील गांधी चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्या नेतृत्‍वात हे आंदोलन झाले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराध्यक्ष राम मिश्रा, सरचिटणीस नागेंद्र रोहनकार, तालुकाध्यक्ष रुपेश खेकडे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, यश आमले, पवन ठाकूर, श्रीकांत जोशी, श्री. देशमुख, कल्पेश बजाज यांनी आंदोलनात भाग घेतला.

संग्रामपूर तालुक्‍यात रास्‍ता रोको
संग्रामपूर ः
तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांच्या नेतृत्वात वरवट बकाल येथे रास्ता रोको करण्यात आले. त्‍यामुळे वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. काही कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. तामगाव पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला. सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन नंतर सोडून सोडून दिले. पदाधिकाऱ्यांनी संग्रामपूर तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठवले. आंदोलनात जानराव देशमुख, राजेंद्र ठाकरे, संग्रामपूर पंचायत समिती सभापती सौ. रत्नप्रभाताई धर्माल, उपसभापती अंबादास चव्हाण, सौ. नंदाताई हागे, पांडुरंग हागे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव भारसाकळे, सुभाष हागे, विठ्ठलराव यादगिरे, प्रवीण ढोरे, संदीप जयस्वाल, सुधीर देविदास लव्हाळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जळगाव जामोदमध्ये पुतळ्याचे दहन
जळगाव जामोद येथे भारतीय जनता पक्षाच्‍या युवा मोर्चातर्फे महाविकास आघाडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांमार्फत राज्यपालांना बारा आमदाराचे निलंबन त्वरित रद्द करण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्य संख्येने उपस्थित होते.

नांदुरा ः माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (छायाचित्र ः पुंडलिक काळे)

शेगावमध्ये मोर्चा
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे शेगाव तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोणारमध्ये निवेदन
लोणारमध्ये तहसीलदारांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष बाबाराव मुंडे, शहराध्यक्ष गजानन मापारी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उध्दव आटोळे, जिल्हा नेते विजय मापारी, मारोतराव सुरूशे, प्रकाश महाराज मुंडे, भगवानराव सानप, शिवाजी सानप, श्रीधर तारे, प्रकाश नागरे, दिनकर डोळे, ज्ञानेश्वर डोळे, सुंदर संचेती, शुभम बनमेरू, किसन गुंजकर, सुरेश अंभोरे, शुभम कुर्रे, वैभव नागरे, बद्री कांगणे, राम गावंडे, गजानन वाघ, दत्ता देसाई आदींची उपस्‍थिती होती.