भाजपचा स्‍थापना दिन ः चिखलीत 27 युवकांनी केले रक्‍तदान!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारतीय जनता पक्षाच्या 41 व्या स्थापना दिनानिमित्त कोरोना महामारीच्या थैमानात रक्ताचा तुटवडा असल्याने आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज, 6 एप्रिलला रक्तदान शिबिर घेण्यात आले. सेवालय या आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या शिबिरात युवा मोर्चाच्या 27 पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. या वेळी आमदार सौ. महाले पाटील …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  भारतीय जनता पक्षाच्‍या 41 व्‍या स्थापना दिनानिमित्त कोरोना महामारीच्या थैमानात रक्ताचा तुटवडा असल्याने आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज, 6 एप्रिलला रक्तदान शिबिर घेण्यात आले.

सेवालय या आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या शिबिरात युवा मोर्चाच्‍या 27 पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. या वेळी आमदार सौ.  महाले पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष पंडितदादा देशमुख, ज्‍येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे पाटील, शहर अध्यक्ष सुदर्शन खरात, नगरसेवक गोविंद देव्हडे, नामु गुरुदासानी, शैलेश बाहेती, प्रा. वीरेंद्र वानखेडे, ॲड. संजय सदार, पंजाबराव धनवे, अंकुश तायडे, सिद्धेश्वर ठेंग, सागर पुरोहित, संदीप लोखंडे, गजेंद्र म्हस्के पाटील, रितेश पवार, दत्ता इंगळे, दुर्गादास मोरे, गोपाळ शेळके, राजीक शहा, कैलास घाडगे, राणा योगेशसिंह राजपूत, डॉ. रवींद्र पवार, आदिनाथ जाधव, संदीप म्हस्के, अनंता सोळंकी, उमेश खंडागळे, शिवराज साप्ते यांची उपस्थिती होती. महेश भगवान पुरी, दुर्गादास भगवान मोरे, सुरेश गणपत शिवरकर, अविनाश केशव भाकडे, सूर्जात सुखदेव रावे, सतीश मधुकर डाबेराव, मंगेश भगवान काटकर, मंदार बाहेकर, दीपक नंदकिशोर शेळके, रितेशकुमार हंसराज भोजवाणी, उमेश खंडागळे, परमेश्वर बापूराव काळे, गोपाल दयाराम पलई, दत्ता इंगळे, गोपाल शळके यांनी रक्तदान केले.

मोठ्या प्रमाणावर रक्तदान करा ः आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील

मागील वर्षी आटोक्यात असणारा कोरोना आज घराघरात घुसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे . रक्ताच्या अभावामुळे कुणाचाही जीव जाऊ नये याकरिता कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून जीवदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे आवाहन आमदार सौ. महाले पाटील यांनी यावेळी केले.