भाजपचे पितामह काळाच्या पडद्याआड; घनश्यामदासजी गांधी यांचे निधन, जळगाव जामोदवर शोककळा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा भाजपचे पितामह, माजी जिल्हाध्यक्ष घनश्यामदासजी उपाख्य काकाजी गांधी यांचे आज, 2 मार्चला पहाटे 12:30 च्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते 84 वर्षांचे होते. दुपारी जळगाव जामोद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.संपूर्ण जिल्ह्यात भाजपा वाढवण्यात त्यांचे योगदान होते. सलग 10 वर्षे ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सुद्धा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा भाजपचे पितामह, माजी जिल्हाध्यक्ष घनश्यामदासजी उपाख्य काकाजी गांधी यांचे आज, 2 मार्चला पहाटे 12:30 च्‍या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते 84 वर्षांचे होते. दुपारी जळगाव जामोद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात भाजपा वाढवण्यात त्यांचे योगदान होते. सलग 10 वर्षे ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सुद्धा ते सदस्य होते.पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते आदी जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या. आणिबाणीत त्यांनी 18 महिने कारावास भोगला होता. यावेळी त्यांच्यासोबत मा. गो. वैद्य आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एकाच कोठडीत होते. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेत असलेल्या घंनश्यामदासजी गांधी यांची भेट घेतली होती.