भाजपच्या आमदाराने भर विधानसभेत पिले सॅनिटायझर

ओडिशा विधानसभेतील प्रकारभुवनेश्वर : सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे समाधान न झाल्याने भाजपच्या आमदारांनी विधानसभा अधिवेशनातच चक्क सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. देवगढ विधानसभा मतदारसंघातील आ. सुभाषचंद्र पाणीग्रही यांनी धान खरेदीसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला अन्न व ग्राहक कल्याणमंत्री रणेंद्रप्रताप स्वैन यांनी उत्तर दिले. पण त्यामुळे पाणीग्रही यांचे समाधान झाले नाही व त्यांनी जवळची सॅनिटायझरची …
 

ओडिशा विधानसभेतील प्रकार
भुवनेश्वर : सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे समाधान न झाल्याने भाजपच्या आमदारांनी विधानसभा अधिवेशनातच चक्क सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. देवगढ विधानसभा मतदारसंघातील आ. सुभाषचंद्र पाणीग्रही यांनी धान खरेदीसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला अन्न व ग्राहक कल्याणमंत्री रणेंद्रप्रताप स्वैन यांनी उत्तर दिले. पण त्यामुळे पाणीग्रही यांचे समाधान झाले नाही व त्यांनी जवळची सॅनिटायझरची बाटली काढून तोंडाला लावली. क्षणभर या प्रकाराने सभागृह थक्क झाले. इतर आमदारांनी त्यांना वेळीच रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. राज्यातील शेतकर्‍यांचा मुद्दा अनेकदा विधानसभेत उपस्थित केला. पण सरकारने त्यांच्याकडे सरकारने दुर्देशेकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे आपल्यापुढे असे करण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता,असा खुलासा सदर आमदारांनी केला.