भाजप खासदाराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला

महिन्याभरात दोन खासदारांनी केल्या आत्महत्या नवी दिल्ली : भाजपचे हिमाचल प्रदेशातील खासदार रामस्वरुप शर्मा हे त्यांच्या सरकारी निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, त्यांचा मृतदेह सकाळी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी,असा प्राथमिअ ंदाज आहे. गेल्या काही दिवसांत खासदारांनी आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे.काही …
 

महिन्याभरात दोन खासदारांनी केल्या आत्महत्या

नवी दिल्ली : भाजपचे हिमाचल प्रदेशातील खासदार रामस्वरुप शर्मा हे त्यांच्या सरकारी निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, त्यांचा मृतदेह सकाळी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी,असा प्राथमिअ ंदाज आहे. गेल्या काही दिवसांत खासदारांनी आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे.काही दिवसांपूर्वी दादर आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबई येऊन आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह मरीन ड्राईव्ह परिसरातील एका हॉटेलात आढळला होता.त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही भाजप नेत्यांची नावे असल्याने विरोधकांनी हे प्रकरण लावून धरले असून त्यासंदर्भात भाजप व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारने या घटनेच्या सीआयडी तपासाचेही आदेश दिले आहेत. शिवसेनेने शर्मा यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. दरम्यान रामस्वरुप शर्मा हे २०१४ मध्ये पहिल्यांदा मंडी लोकसभा मतदरासंघातून खासदार झाले. २०१९ मध्ये ते दुसर्‍यांदा निवडून आले. त्यांच्या मृत्यमुळे भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक रद्द करण्यात आली. संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.