भाजप खासदाराच्या चेहर्‍यावर फेकला रसायनमिश्रीत रंग

पश्चिम बंगालमधील घटना; प्रकृती गंभीरकोलकाता : पश्चिम बंगालमधील होळीला राजकीय व द्वेषाच्या राजकारणाचा रंग चढला आहे. त्यामुळे प्रचाराचा बेरंग होत आहे. हुगळी येथून लोकसभेवर निवडून आलेल्या व चुंचडाविधानसभेसाठी पक्षाच्या उमेदवार असलेल्या महिला खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्यावर प्रचारादरम्यान रसायनमिश्रीत रंग फेकण्यात आला आहे. हा रंग त्यांच्या डोळ्यात गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून प्रकृती बिघडल्याने त्यांना …
 

पश्चिम बंगालमधील घटना; प्रकृती गंभीर
कोलकाता :
पश्चिम बंगालमधील होळीला राजकीय व द्वेषाच्या राजकारणाचा रंग चढला आहे. त्यामुळे प्रचाराचा बेरंग होत आहे. हुगळी येथून लोकसभेवर निवडून आलेल्या व चुंचडाविधानसभेसाठी पक्षाच्या उमेदवार असलेल्या महिला खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्यावर प्रचारादरम्यान रसायनमिश्रीत रंग फेकण्यात आला आहे. हा रंग त्यांच्या डोळ्यात गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.भाजपने याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे.
ही घटना चुंचुडा विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान घडली आहे. लॉकेट चॅटर्जी या त्या उभ्या असलेल्या मतदारसंघातील रविंद्रनगर कालीतला भागात प्रचार करत होत्या.तेथे होळीनिमित्त वसंत उत्सव सुरू होता. कोदालिया-२ ग्रामपंचायतीचे प्रमुख विद्यूत विश्वास यांच्या नेतृत्वातील अज्ञात व्यक्तींनी आपल्या अंगावर रसायनमिश्रीत वस्तू फेकल्याचा दावा भाजपने केला आहे.आपल्यावर हानीकारक रसायनमिश्रीत रंग फेकण्यात आला. हा रंग कुणी फेकला हे पाहिल्यावर तेथे टीएमसीचे कार्यकर्ते होते, असा दावा चॅटर्जी यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी याचा इन्कार केला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेसाठी मतदानाचा पहिला टप्पा शनिवारी पार पडला. आणखी सात टप्पे बाकी असून निकाल २ मे रोजी लागणार आहे.